द रिअल हिरो डॉ. सचिन सानप ..!
एक आदर्श प्रशासक कसा असावा याचं ज्वलत आणि जिवंत उदाहरण म्हणजे गेवराई पंचायत समितीचे विद्यामान गटविकास अधिकारी डॉ. सचिन सानप होय, भारत स्वतंत्र्य काळापासुन ज्या वाडी, वस्ती, तांडा जाण्यासाठी मार्ग नव्हते शेकडो वर्षापासुन शेतात जाण्यासाठी शेतीकामासाठी रस्ते नव्हते त्या ठिकाणी आज शेतकऱ्यांना उत्कृष्ठ रस्ते दर्जाचे खडीरस्ते तयार करण्यात गटविकास अधिकारी डॉ. सचिन सानप यांचा सिंहाचा वाटा आहे. शेकडो रस्ते आज पुर्ण होऊन वाहतुकिसाठी वापरात आणली गेली आहेत. शेकडो वर्षे चिखलातुन ये जा करणारे लोक आज खडीकरणावरुन ये जा करतात त्या सर्वांचे आशिर्वाद डॉ. सचिन सानप यांना लागत आहेत. अत्यंत संयमी स्वभावाचे गटविकास अधिकारी या गेवराई तालुक्याला लाभले आहेत अशी चर्चा आहे. तालुक्यातील कुठलाही व्यक्ती गेवराई पंचायत समितीमध्ये गेल्यास त्याला कोठेही कामासाठी ताटकळत उभा राहावे लागत नाही. त्याचे काम अगदी काही वेळात मार्गी लावले जाते. कुठल्याही व्यक्तीकडुन कसलीच अपेक्षा न करता डॉ. सचिन सानप कामाच्या कागदावर सह्या करून कामे मार्गी लावतात. त्यामुळे तालुक्यातील सर्व पक्षीय सरपंच याच्या मनावर अधिराज्य करणारे व विकास कामासाठी प्रयत्नशिल असे व्यक्तीमत्व म्हणून गेवराईचे गटविकास अधिकारी डॉ. सचिन सानप यांच्याकडे पाहिले जाते. फळबाग, कांदाचाळ, शेडनेट, पॉलीहाऊस, त्यांनी कृषि विभागामार्फत अनेक प्रकारे राबवुन घेतले आहे. गायगोठे या प्रकारची संकल्पना प्रत्यक्षात उतरवुन गटविकास अधिकारी डॉ. सचिन सानप साहेब यांनी मुक्या प्राण्यांसाठी प्रशस्त गोठ्यासाठी निर्मिती करण्यास ग्रामपंचायतींना भाग पाडले आहे. हजारो शेतकऱ्यांना गायगोठ्याचा लाभ दिला आहे. रोजगार हमी योजने मार्फत शेततळे खोदुन गेवराई तालुक्यातील बऱ्याच भागाला पाण्याची जी टंचाई भासत होती ती नष्ट करण्यास हातभार लावला अशी एक न अनेक कामें करण्यासाठी सर्व सरपंच यांना बळ देणारे अधिकारी ना भुतो ना भतिष्य ते असे गटविकास अधिकारी या गेवराई तालुक्याला लाभले याचा मनास्वी आनंद वाटत आहे. शहरी जिवन आणि ग्रामीण जिवन एक समान करणारा अधिकारी म्हणुन डॉ. सचिन सानप यांच्याकडे पाहिले जाते. हा बदल शेतकरी पुत्र असल्यामुळे व ग्रामीण लोक जिवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी काहित असल्यामुळे डॉ. सानप करु शकले. अत्यंत गोरगरीब लाभार्थी निवड करुन त्यांना लाभ मिळतो का याची शहनिशा करणारे डॉ. सानप आहे. प्रत्यक्ष रस्ता होता का प्रत्यक्ष काम व्यवस्थित चालु आहे का याची समक्ष भेट देऊन शहानिशा डॉ. सचिन साप करतात अशा कर्तव्यदक्ष अधिकारी यांची गेवराई गटविकास अधिकारी म्हणुन वर्णी लागली याचा खुप आनंद होत आहे. सर्व कामे करताना गेवराईतील सर्व राजकीय पुढारी नेते मंडळी सामान्य जनता, पत्रकार, यांनी मोलाच सहकार्य केले आहे. गेवराई तालुका अधिकारी वर्गाला संभाळुन घेणारा तालुका आहे सिध्द झाले आहे. गेवराईच्या विकासाच्या जडण घडणित मोलाचा वाटा उचलणारे द रिअल हिरो डॉ. सचिन सानप सर्व सामान्य लोकाचे प्रिय झाले आहेत.
लेखक :- ज्ञानेश्वर नवले सरपंच