गेवराई येथे मतिमंद निवासी विद्यालयात प्रवेश सोहळा उत्साहात
विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करुन शैक्षणिक साहित्यासह पुष्पगुच्छ देवून केले स्वागत
गेवराई दि १५ ( वार्ताहार )
रेणुकामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महांडुळा संचलित मतिमंद निवासी विद्यालय गेवराई येथे बुधवारी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करुन शैक्षणिक साहित्यासह पुष्पगुच्छ देवून विद्यार्थ्यांचे औक्षण करुन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या सचिव सौ.रेणुका लहुराव ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते सचिनदादा ढाकणे, दिव्यांग विकास मंचचे जिल्हाध्यक्ष सरफराज पठाण, गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे, पालक प्रतिनिधी मडकर, रामदासी यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषणात बोलताना रविंद्र अरबाड म्हणाले की दिव्यांग विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हितासाठी तसेच सुख- सुविधेसाठी आमची संस्था निस्वार्थपणे काम करत आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे खुप नुकसान झाले आहे. तरी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या दिव्यांग पाल्याच्या प्रवेशासाठी त्वरित आमच्या विशेष शाळेत संपर्क साधून प्रवेश घ्यावा असे आवाहनही शेवटी बोलताना त्यांनी व्यक्त केले. दरम्यान यावेळी शालेय परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध फुलांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माणिकराव रणबावळे, रविंद्र अरबाड, संदिप खाडे, शिवाजी ढोबळे, गणेश कदरे, भाग्यश्री मिसाळ, मिनाक्षी शिंदे,संतोष पुंड, सुनील गाडेकर, गोविंद कदरे, विनोद साळवे, विष्णू बर्वे, प्रशांत सरोदे, भागिरथी उगले, तुकाराम बाबर, सुशांत शिंदे, अंकुश लाटे, काका मुंढे यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन विनोद पौळ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.