April 19, 2025

१३७ ग्रामपंचायतीच्या अपहार प्रकरणी वंचितचे उपोषण


गेवराई दि १५ ( वार्ताहार ) तालुक्यातील १३७ ग्रामपंचायतीमध्ये दलीत वस्तीचा निधी ईतर ठिकाणी वापर करूण त्यामध्ये करोंडो रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार यापुर्वीच वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष पप्पू गायवाड यांनी दिली होती. मात्र या प्रकरणी प्रशासनाने कसलीही कार्यवाई केली नाही म्हणून आता गेवराई पंचायत समिती समोर वंचितच्या कार्यकर्त्यांकडून अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत तालुक्यातील १३७ ग्रामपंचायतीचा समावेश आहे यामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत तसेच गावपातळीवर दलीत वस्तीचा निधी सरपंच व ग्रामसेवक , अभियंता यांनी कसलीही कामे न करता परस्पर हडप केला असल्याची तक्रार यापुर्वीच जिल्हाधिकारी , कार्यकारी अधिकारी , तहसिलदार , गटविकास अधिकारी , यांना देण्यात आली होती . परंतू या प्रकरणी कसलीही कार्यवाई न केल्यानं आता पंचायत समिती गेवराई कार्यलयाच्या आवारात वंचित आघाडी कडून अमरण उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे तसेच या प्रकरणी संबंधीत सरपंच , ग्रामसेवक , अभियंता , यांची समिती गठीत करूण त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उपोषण कर्त्यांची आहे तसेच या उपोषणात वंंचितचे तालुक्याचे अध्यक्ष पप्पू गायकवाड , किशोर भोले , सुदेष पोतदार , किशोर चव्हाण , देवराज कोळे , दस्तगिर शेख , भिमराव चव्हाण , बाबासाहेब शरणांगत , ज्ञानेश्वर हवाले , बाळासाहेब मुळीक , लखन मगर , अजय खरात , यांचा समावेश आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *