गर्भपात प्रकरणी खाजगी एजंन्ट महिलेला गेवराईतून अटक

मध्यरात्री बीड पोलिसांनी घरातून  तिस लाखं रुपयाचं घबाड केलं जप्त

गेवराई दि ८ ( वार्ताहार ) अवैध गर्भपात केल्यानंतर संगिता गाडे या महिलेचा रक्त स्तराव होऊन मृत्यू झाला आहे या प्रकरणी बीड पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी गेवराई येथील खाजगी एजंन्ट अंगणवाडी सेविका मनिषा सानप हिला गेवराई येथून राहत्या घरातून अटक केली आहे तसेच झडती दरम्यान या महिलेच्या घरतून तिस लाखं रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , पिंपळणेर पोलिस ठाणे हद्दीतील एक विवाहित महिला संगिता गाडे ही चौथ्यांदा गरोदर होती ह्या महिलेचा गर्भपात करण्यासाठी गेवराई येथिल खाजगी एजन्ट अंगणवाडी सेविका मनिषा सानप हिने या महलेची तपाणी आपल्या गेवराई येथील निवासस्थांनी केली होती ( दि ७ जून ) रोजी या महिलेच्या गेवराई याठिकाणी बीड पोलिसांनी छापा टाकला आठ तास पोलिस या घराची पाहणी करून तपास करत होते दरम्यान या महिलेच्या घरातून बीड पोलिसांना अवैध गर्भपात करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले तसेच या महिला एजंन्टच्या घरात तिस लाखं रूपयाच घबाड पोलिसांना मिळाले आहे बॅंकेचे पासबूक पोलिसांंनी ताब्यात घेत ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे तसेच ह्या महिला एजंन्टला बेड्या ठोकल्या आहेत तसेच या प्रकरणी आनखी आरोपी वाढू शकतात दरम्यान या प्रकरणी उप अधीक्षक संतोष वाळके यांना संपर्क केला असता या प्रकरणी मोठे रॅकेट असुन लकरच त्यांना अटक करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *