गेवराई दि ६ ( वार्ताहार ) तालुक्यातील गंगावाडी या ठिकाणी सुरू असलेला वाळू ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी गंगावडी ग्रामस्थ व स्थानिक आमदार यांनी जल आंदोलन करण्यात आले होते तसेच सदरचा वाळू ठेका नियमबाह्य असल्याने रद्द करण्यात यावा ही मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी गांवकऱ्याला दोन दिवसांत वाळू ठेका रद्द करण्यात येईल असे अश्वासन दिले होते. त्या अनुषगाने जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन त्री समिची नेमणूक केली असुन चोविस तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत .