पत्रकार विनोद नरसाळे ग्रामभुषण पुरस्काराने सन्मानित
गेवराई : दि ५ ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील तांदळा येथील श्रीक्षेत्र साईबाबा मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायत कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार विनोद नरसाळे यांना ग्रामभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार विनोद नरसाळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला संत-महंतांसह अनेकांची उपस्थिती होती.
तांदळा येथे भव्य असे साईमंदिर उभारण्यात आलेले आहे. या मंदिराचा वर्धापनदिन हा दरवर्षी विविध कार्यक्रमासह विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान यावर्षीपासून मंदिराचे संस्थापक तथा शिर्डी येथील साईबाबा मंदिराचे पुजारी दिलीप सुलाखे शास्त्री यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ग्रामभुषण पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पत्रकार विनोद नरसाळे यांना ग्रामभुषण हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी तांदळा येथील साईमंदिराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार विनोद नरसाळे यांना महंत शिवस्वरुपानंदजी महाराज (ठाणे), महंत स्वामी जनार्दन महाराज (श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथगड निमगाव), युवा उद्योजक संदीप बोरा, एअर इंडिया एशिया चीफ प्रमुख कैलाससिंग, साईबाबा मंदिराचे विश्वस्त दिलीप सुलाखे शास्त्री यांच्या हस्ते संन्मानचिन्हासह गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला साई भक्तांसह ग्रामस्थ, महिला यांची मोठी उपस्थिती होती. दरम्यान पत्रकार विनोद नरसाळे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...