April 19, 2025

गेवराई तालुक्यातील १३७ ग्रामपंचायतीत करोडोचा भ्रष्टाचार

समितीद्वारे चौकशी करून दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची  पप्पु गायवाड यांची मागणी 

                गेवराई दि २४ ( वार्ताहार ) 
तालुक्यातील जवळपास १३७ ग्रामपंचायतीने दलित वस्ती सुधार योजनेसह वित्त आयोगाचा आलेल्या निधीचा गैरवापर करून दलित वस्ती सुधार योजनेतुन समाज मंदिर, स्मशान भूमी व संरक्षण भिंत, सिमेंट रस्ते, नालीचे कामे निकृष्ट दर्जाची केली, पथदिवे निकृष्ट दर्जाची बसवली तर काही ठिकाणी बसवलीच नाहीत, दलिवस्तीचा निधी ईतर ठीकाणी वापरला तर काही ठिकाणी कामे न करता केवळ कागदी घोडे नाचवत सरपंच, ग्रामसेवक व सबंधीत इंजिनिअर यांनी संगणमताने बोगस बिले उचलून निधी हाडप करुन करोडोचा भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागिय अयुक्त यांना वंचित बहुजन आघाडीच्यावतिने निवेदनाद्वारे केली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की ,२०१८ ते २०२२  या चार आर्थिक वर्षात दलित वस्ती सुधारणेसाठी केंद्र व राज्य सरकारने करोडो रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना दिला मात्र याचा व्यवस्थित विनिमय न करता सबंधीत ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व इंजिनिअर यांनी संगनमत करून निकृष्ट दर्जाची कामे करत कागदोपत्री कामे केल्याचे दाखवत बोगस बिले उचलली यात चकलांबा, धोंडराई, रामपुरी, बेलगाव, मालेगाव खु, गोळेगाव, सिंदखेड, गढी, सुरळेगांव, केकतपांगरी, सिरसदेवी, माटेगाव, बागपिंपळगाव, राजपिंप्री, देवपिंप्री, सुशी-वडगाव, कोल्हेर, रेवकी-देवकी, रसूलाबाद, बोरगाव थडी, गुंतेगाव यासह इतर १२० ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.

अनेक ठिकाणी समाज मंदिरे, स्मशानभूमी, रस्ते, नाल्या नाहीत तर काही ठिकाणी दलित वस्तीला जाणीवपूर्वक ८ ते १५ दिवस पाणी पुरवठा केला जात नसल्याने येथील ग्रामस्थांचे पाण्याविना नाहक हाल होत आहेत.तरी तक्रार निवेदन दिल्याप्रमाणे सबंधीत ग्रामपंचायत व सबंधीत अधिकारी यांची समिती स्थापन करून चौकशी करुन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत नसता १० जून २०२२ रोजी ग्रामस्थांसह पचांयत समिती गेवराई येथे अमरण उपोषण करु या काळात काही अनुचित प्रकार घडल्यास यास सर्वस्वी शासन जबाबदार राहिल असा कार्यकारी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड, महासचिव किशोर भोले, ज्ञानेश्वर हवाले, सुंदर खापरे, देवराज केळे, अदिनाथ खंडागळे यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनाद्वारे ईशारा देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *