April 19, 2025

दलाल बक्शु शेख यांच्यावर दूसरा गुन्हा दाखल

                    बीड दि २३ ( वार्ताहार ) 

पोलिस स्टेशन बीड ग्रामीण येथे कलम ४२० अंतर्गत दाखल गुन्ह्यात फरार असलेला आरोपी दलाल बक्शु शेख याच्याविरोधात आज बीड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय ,बीड येथील मोटार वाहन निरीक्षक श्री गणेश जयराम विघ्ने यांनी अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे.

४२० अंतर्गत दाखल गुन्ह्यात फरारी असलेला दलाल बक्शु शेख याने अज्ञात स्थळावरून व्हिडिओ व्हायरल करून व्यक्तीश: श्री गणेश जयराम विघ्ने यांची तसेच परिवहन विभागाची, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांची बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.सदर दलाल हा त्याच्यावर यापूर्वी ३५३ अंतर्गत दाखल गुन्ह्यात जामीनावर बाहेर आहे.आपल्या बदनामीमुळे विभागासाठी चांगले काम करत असतानाही आपल्या होणाऱ्या बदनामी मुळे व्यथीत होऊन श्री गणेश विघ्ने हे सदर दलाला विरोधात दिवाणी न्यायालयातही अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती असुन या व्हिडीओ व्हायरल केल्यानं त्याच्यांविरूद्ध दूसरा गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास बीड पोलिस करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *