April 19, 2025

आशा मदने या राज्यस्तरीय यशवंत रत्न पुरस्कारने सन्मानित


गेवराई दि १८ ( वार्ताहार ) कोरोना काळात केल्या उत्कृष्ट कार्याबद्दल अशा सेविका आशा भागुजी मदने यांना मंगळवार दि.16 रोजी बीड येथील स्वर्गीय यशवंतरावजी नाट्यग्रह येथे माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या हस्ते मल्हार प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय यशवंत रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तालुक्यातील तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उप आरोग्य केंद्र रेवकी येथे आशा सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या आशा भागुजी मदने यांनी कोरोना 19 साथीच्या काळात कर्तव्य बजावून रूग्णांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धिर देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविले तसेच या रोगाला न भित्ता त्यांनी रूग्णांना सेवा पुरविण्याचे उत्कृष्ट कार्य केले होते. या कार्याची दखल घेऊन मंगळवार दि. 16 रोजी आशा भागुजी मदने यांना बीड येथील स्वर्गीय यशवंतरावजी नाट्यग्रह येथे माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या हस्ते मल्हार प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय यशवंत रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी इंजिनीयर विष्णू देवकते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. शिवाजीराव राऊत आदींची उपस्थिती होती. आशा मदने यांना मिळालेल्या पुरस्कारा मुळे त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *