April 19, 2025

प्रेम प्रकरणातील आरोपी नवऱ्यासह सासऱ्याला बेड्या

चोविस तासांत गेवराई पोलिसांनी केली अटक 

गेवराई दि १७ ( वार्ताहार ) तालुक्यातील दिमाखवाडी येथील तरूणी सोबत प्रेम विवाह केल्यानंतर तिच्यावर हुंड्यासाठी मानसिक व शारिरीक छळ सासरच्या लोकांंनी सुरू केला माहेरून पाच लाख रूपये घेऊन ये असा तकादा वारवार सासरच्या मंडळीकडून लावण्यात येत होता याला नकार दिल्यानं नवरा , सासु आणि सासरा , यांनी या तरूणीवर पेट्रोल टाकुून जिवंत जाळल्या प्रकरणी गेवराई पोलिसांत तिघांविरोधात ( दि १४ मे ) रोजी  गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणी नवरा आणि सासरा यांना गेवराई पोलिसांनी अटक केली आहे .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , गावातील एका मुलाबरोबर प्रेम संबंध जूळले आणि दोन वर्षापासुन हे संबंध होते याचं रुपातंर लग्नात झाले नातेवाईकांविरोधात जाऊन लग्न झाले मात्र लग्नाला अडीज महिन्यांचा कालावधी लोटताच सासऱ्यांच्या लोकांकडून पाढंऱ्या पायची आहेस आमच्या मुलाला फसवले तूझ्या आई वडिलाकडून पाच लाखं रूपये घेऊन ये असे म्हणत नवरा , सासु , सासरा , यांनी छळाला सुरूवात केली अनेकवेळा नवऱ्याने देखील हानमार केली ऐवढ्यावरच नथांबता या तरूणीला पेट्रोल अंगावर टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न वरिल लोकांनी केला तसेच ही पिडीत तरूणी आत्महत्या कराण्याच्या मनस्थितीत होती परंतू नातेवाईकांनी वाचवले व गेवराई पोलिसांत धाव घेतली आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला गेवराई पोलिसांनी चोविस तासांत नवरा मुलगा अजय सुरेश राजगूडे व सासरा सुरेश सजदेव राजगूडे दोन्ही राहनार दिमाखवाडी ता गेवराई जि बीड अटक केलेल्या आरोपीची नावे असुन सदरची अटकेची कार्यवाई ही पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार , साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे , विठ्ठल देशमुख , अप्पा बळवंत , गर्जे यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *