April 19, 2025

सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना अटक

रामपुरी या ठिकाणी घडली होती घटना

गेेवराई दि १२ ( वार्ताहार ) तालुक्यातील रामपुरी याठिकाणी सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणी तलवाडा पोलिसांत बाललैंगिक अत्याचार तसेच अन्यकलान्वे गून्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , सुंदर निवृत्ती तायड ( वय ३४ वर्ष ) व विनोद गणपत शरणांगत ( वय २२ वर्ष ) दोघे राहणार रामपुरी तालुका गेवराई जिल्हा बीड असे या आरोपीचे नावे असुन ( दि ५ मे ) रोजी घराच्या हाकेच्या अंतारावर असनाऱ्या या दोघांंनी सहा वर्षाच्या चिमुकीला घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची बाब पिडीतेच्या आईला लक्षात आल्यानंतर त्यांनी तलवाडा पोलिसांत धाव घेतली या प्रकरणी कसलाही विलंब न करता पोलिसांनी गुन्हा दाखल केला तसेच एक आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र पिडीतेला न्यायालयात हजर केल्यानंतर दोन व्यक्ती होते असा जबाब पिडीतेने दिल्यानंतर दुसरा आरोपीचे नाव या गुन्हात समाविष्ट करण्यात आले तसेच वरील आरोपी याकडे मोबाईल नसल्याने त्याला अटक करणे तारेवरची कसरत पोलिसांची होती तसेच ( दि ११ मे वार बूधवार ) रोजी रात्री उशीरा हडपसर पुणे येथून मुख्यआरोपीला व त्याचां साथीदार याला रामपुरी याठिकाणावरूण पोलिसांनी अटक केली आहे सदरची अटकेची कार्यवाई पिंक पथक प्रमुख तपास अधिकारी अर्चना भोसले , पोहे खाडे , पोहे जिक्रे , वाहन चालक सोंळूखे यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *