गेवराई दि ६ ( वार्ताहार ) गेवराई तालक्यातील सौर पंप व त्यांच्या प्लेटा चोरनारी टोळी सक्रीय होती अश्या गुन्हातील टोळी एक ट्रॅक्टरमध्ये सौर पंप व त्यांच्या प्लेटा घेऊन जात असल्याची माहिती गेवराईच्या डीबी पथकाला मिळाली होती त्यवरून पाठलाग करून ही टोळी पकडण्यात गेवराई पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाला यश आले असुन त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर , ट्रॉली , सौरपंपाचा सेठ असे मिळून एकून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
या बाबत अधिक माहिती अशी की , गेवराई तालुक्यातील रानमळा परिसरात एका ट्रॅक्टर मधून सौर पंप व त्यांच्या प्लेटा चोरून घेऊन जात असलयाची माहिती गेवराईच्या डीबी पथकाला मिळाली पोलिसांनी पाठलाग करून तिन आरोपीना ताब्यात घेतले असल्याची माहिती सदर अनेक चोरटे यामध्ये असन्याची दाट शक्यता आहे अद्याप पर्यंत या प्रकरणात चौकशी सुरू असुन पुढील कार्यवाई करण्यात येईल .तसेच या तिन आरोपीना मोबाईल लोकेशनवरून पकण्यात आले असुन या बाबद आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे तसेच दहा लाखांचा देखील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .