उमेश शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट

तपास अधिकारी यांची भूमिका संशयास्पद

गेवराई दि २ ( वार्ताहार ) गेवराई शहरातील तरूण उमेश शिंदे यांची विषारी द्रव्य पाजून त्यांची हत्या सारसच्या मंडळीनी केली तसेच चार दिवसांनंतर या प्रकरणात दिंद्रूड पोलिसांत गुन्हा ही दाखल करण्यात आला मात्र अद्याप या प्रकरणात एकही आरोपी अटक नाही तसेच तपास अधिकारी या प्रकरणी काही माहिती विचारल्यास जाणिवपुर्वक टाळाटाळ करतात तसेच त्यांच्या भुमिकेवर उमेशच्या नातेवाईक यांनी संशय व्यक्त केला असुन अद्याप या प्रकरणात आरोपी मोकाटच आहेत .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , उमेश दिपक शिंदे ( वय २४ वर्ष ) राहनार शिवाजी नगर गेवराई असे खून झालेल्या युवकांचे नाव असुन ( दि १६ एप्रिल ) रोजी उमेशच्या सासऱ्याने उमेशला फोन करून सांगितले की तुझ्या बायकोला घेऊन जा त्यानंतर उमेशचा धाकडा भाऊ कृष्णा याला उमेशने सांगितले की आपण दोघेजण जाऊन माझ्या बायकोला घेऊन येऊ असे सांगून ते लोनगांव तालुका माजलगाव या ठिकाणी मोटार सायकलवर गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर उमेशच्या सासऱ्यांनी गाडीची चावी काढून घेत त्यास मारहान करण्यास सुरूवात केली त्यानंतर त्यांची सासु व बायको ईतर व नातेवाईक यांनी उमेशचे हातपाय पकडून त्याला विषारी द्रव्य पाजले त्यानंतर तु जर कुनाला सांगितले तर तुलाही मारून टाकू अशी धमकी धाकटा भाऊ कृष्णा यास दिली त्यानंतर त्यांनी उमेशला माजलगावच्या ग्रामिण रूग्णलयात उपचारासाठी दाखल केले व प्राथमिक उपचार करूण उमेशला बीडच्या जिल्हा रूग्णलयात हलवले तसेच उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला आई व वडिल बाहेर असल्याने त्यांच्यावर चार दिवसांनंतर उत्तरीय तपासनी करण्यात आली व संतोष उर्फ पिन्या रामेश्वर भोसले , सुनिल समशेर भोसले , कविता संतोष भोसले ,रुपाली उमेश शिंदे यांच्या विरूद्ध खुनासह अन्य कलामान्वे दिंद्रूड पोलिसांत गुन्हा दाखल आहे अद्याप पर्यंत एकही आरोपी पोलिसांनी पकडलेला नाही पोलिस मदत करत नाहिती त्यांच्या भूमिकेवर मयत उमेश यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असुन आम्ही लवकरच या प्रकरणी ठोस पाऊल उचलू असेही त्यांनी सांगितले असुन या प्रकरणाचे तपासी अधिकारी सौ प्रभा पुडंगे यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *