April 19, 2025

पंकज देशमुख यांच्याकडे बीड पोलिस अधीक्षक पदाचा अतिरीक्त पदभार 

बीडः आर. राजा यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या बीडच्या पोलीस अधिक्षक पदाचा अतिरिक्त पदभार पुणे सीआयडीचे एसपी पंकज देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे. ते शनिवारी पदभार घेणार आहेत.बीडसह जालना आणि अमरावती या तीन जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक पद रिक्त असल्याने या तीन ठिकाणचा अतिरिक्त पदभार इतर अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.यात बीडचा अतिरिक्त पदभार पुणे सीआयडीचे एसपी पंकज देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे. देशमुख यांनी यापुर्वी उस्मानाबाद येथे एसपी म्हणून काम केले असल्याने त्यांना मराठवडयाचा अनुभव आहे. ते आता काही दिवसांसाठी बीडची सुत्रे सांभाळणार आहेत.बीडप्रमाणेच जालन्याचा अतिरिक्त पदभार हर्ष पोद्दार यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *