बनावट लग्नातील रेखासह आईला ठोकल्या बेड्या

गेवराई पोलिसांनी औरंगाबाद येथून केली अटक

गेवराई दि २६ ( वार्ताहार ) बनावट लग्न करून दोन लाखं रुपयाला गंडा घालुन पसार झालेल्या लग्नातील या नवरी व तिच्या नातेवाईकां विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा गेवराई पोलिसांत गणेश फरताळे यांनी दाखल केला होता त्यावरून आज ( दि २६ ) रोजी या बनावट लग्नातील रेखाला गेवराई पोलिसांनी औरंगाबाद याठिकाणावरून अटक करण्यात आली आहे .तसेच तीच्या आईलाही ताब्यात घेण्यात आलं आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील गणेश फरताळे या तरूणांचा विवाह रेखा बाळू चौधरी हिच्या सोबत झाला होता परंतू लग्नाच्या दोन दिवसांच्या नंतर नवरी रेखा ही फुर्र झाली होती त्यानंतर गणेश फरताळे यांनी माहिती काढली असता रेखा हिचे आगोदरच लग्न झाले असुन तीला दोन आपत्य असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर त्याने पोलिसांंत धाव घेतली व पाच जनाविरूद्ध गेवराई पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाशी निगडीत असनारा मुख्य आरोपी रामकिसन तापडीया याला व त्याचा साथीदार विठ्ठल पवार या दोघांनाही गेवराई पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणा वरून आठ दिवसांपुर्वीच अटक केले आहे तपासांत या टोळीने अनेक लग्न बनावट केले असल्याची माहिती सुत्रांनी दिली असुन आता या आज या प्रकरणी या बनावट नवरीलाव तीच्या आईला गेवराई पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे तसेच सदरची कार्यवाई ही पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार , उप अधीक्षक सोप्नील राठोड , पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार , यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ साजेद सिद्धीकी , सफो सुरेश पारधी , नवनाथ गोरे , शेखर हिंगवार ,जोती सांळूखे , यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *