गेल्या दोन दिवसांपुर्वी मनोज आव्हाड या तरूणांचा चोरीच्या संशयावरून अमानुष पणे मारहान करून निर्घून खुन झाल्याची घटना औंरगाबाद याठिकाणी घडली तसेच या हत्याकांडाचा व्हिडीओ सोशलमिडीयावर प्रचंड व्हॉयरल झाला आहे याच कारणाने ( दि २३ रोजी ) दसरा मैदान परिसरात हायवे वर मातंग समाजाचा तरूणांनी दोन बसवर अचानक दगडफेक करून टायर जाळले व निषेध व्यक्त केला
या बाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई शहरातील हायवेवर रात्री साडे सात वाजण्याच्या दरम्यान अचानक काही तरूण यांनी रस्त्यावर येऊन दोन बसवर अंधाधूद दगडफेक केली व टायर जाळले घटनेची माहिती मिळताच घटनास्तळावर मोठा पोलिस बंदोबस्त दाखल झाला होता पोलिस येण्यापुर्वींच हे तरूण पसार झाले होते मात्र ही घटना का ? घडली याचा अंदाज पोलिसांना नव्हता सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सदरील दगडफेक व टायर जाळून मनोज गायवाड हत्याकांडाचा निषेध मातंग समाजातील तरूणांनी नोंदवला असल्याची माहिती असुन या प्रकरणी रात्री उशीरा गेवराई पोलिसांत आज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत .