बेकायदेशीर खरेदी प्रकरणी व्यापाऱ्यावर गेवराई बाजार समितीने केला गुन्हा दाखल
गेवराई दि २३ ( वार्ताहार )
बेकायदेशीर व विना परवाना कापूस खरेदी प्रकरणी गेवराई पोलीस स्टेशन येथे मुक्ताजी राजाराम लादे रा. वडाचीवाडी ता. गेवराई जिल्हा बीड यांच्याविरुद्ध कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराई ने गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि , गेवराई बाजार समितीचे सचिव गंगाभीषण आसाराम शिंदे रा. खांडवी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि , कृषी उत्पन्न (विकास व विनियमन ) अधिनियम १९६३ अन्वये शेतमालाची खरेदी विक्री चालवली जाते. कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराईचे अधिकार क्षेत्र संपूर्ण गेवराई तालुका आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन ) अधिनियम १९६३ चे कलम ६ पोटकलम (१) च्या उपबंधानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराई चे बाजार क्षेत्रातील कोणत्याही जागेचा कोणत्याही कृषी उत्पन्नाच्या खरेदी विक्रीसाठी व प्रक्रिया उपयोग करण्यास अथवा व्यापार करण्यास परवानगी घेणे गरजेचे आहे. मे. सोमाणी जिनींग प्रा. लि , पाडळसिंगी ता. गेवराई या जिनींग फॅक्टरीमध्ये मुक्ताजी राजाराम लादे रा. वडाची वाडी ता. गेवराई हे विनापरवाना कापूस खरेदी करत आहेत. तसेच खरेदी केलेल्या कापसावर मे. सोमाणी जिनींग प्रा.ली, पाडळसिंगी या जिनींगमध्ये प्रक्रिया करून गठन तयार करून त्याची विक्री करत आहेत.
मुक्ताजी लादे यांनी बेकायदेशीर कापूस खरेदी केलेली असून मोठ्या प्रमाणात गेवराई बाजार समिती ची बाजार फी व शासनाची देखरेख फी बुडवली आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र कृषी खरेदी विक्री (विकास व विनियमन ) अधिनियम १९६३ चे कलम ६ पोटकलम १ चे उल्लंघन केले आहे व नियमांचा भंग केला आहे. मुक्ताजी राजाराम लादे यांना कापूस व इतर शेतमाल खरेदी परवाण्याबाबत वेळोवेळी तोंडी व लेखी सूचना देऊनही त्यांनी गेवराई बाजार समितीस कसल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. या कार्यालयाचे कर्मचारी दैनंदिन कापूस खरेदी आणण्यासाठी मे. सोमाणी जिनींग प्रा ली पाडळसिंगी ता. गेवराई येथे जात असताना दिनांक १८/०४/२०२२ रोजी पर्यंत मुक्ताजी राजाराम लादे रा. वडाची वाडी ता. गेवराई यांनी मे. सोमाणी जिनींग प्रा. लि पाडळसिंगी ता. गेवराई या जिनींगमध्ये चालू वर्षी कापूस हंगाम साल सन २०२१-२२ मध्ये अंदाजे २५००० क्विंटल कापसाची खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून गठन तयार केलेली आहे. या खरेदीपोटी लादे यांनी एकूण २५ लाख बाजार फी व १२५०००/- देखभाल फी अशी दिनांक ०१/११/२०२१ ते दिनांक २३/०४/२०२२ रोजीपर्यंत बुडवलेली आहे. आणि कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराई यांची फसवणूक केली आहे. मुक्ताजी राजाराम लादे , रा. वडाची वाडी ता. गेवराई जिल्हा बीड यांच्याविरुद्ध महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन ) अधिनियम १९६३ व नियम १९६७ चे कलम ६(१)(अ)(ब ) व कलम ४२० भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पो.हे. कॉ. ए. बी. शेळके हे करत आहेत.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...