तहसिलदार सचिन खाडे यांच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे रद्द
मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औंरगाबाद यांचे आदेश
गेवराई दि २१ ( वार्ताहार ) गेवराई तालुक्याचे न्यायदंडाधिकारी तथा तहसिलदार सचिन खाडे यांच्या विरोधात वाळू माफिया यांच्या नातेवाईक असलेल्या महिलांनी धमकावल्या प्रकरणी वेगवेगळे तिन गुन्हे गेवराई पोलिसांत दाखल केले होते परंतू तहसिलदारावर असे गुन्हे दाखल होने ही पहिलीच घटना होती याला अहवान देण्यासाठी तहसिलदार सचिन खाडे यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औंरगाबाद याठिकाणी गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती या प्रकरणी आज (दि २१ एप्रिल रोजी ) सुनावणी झाली व हे तिन्ही गुन्हे रद्द करण्याचे आदेश खंडपिठाने दिले आहेत .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , गेवराई तालुक्यात वाळू माफियांनी नंगा नाच चालवला होता याच प्रकरणी तहसिलदार सचिन खाडे यांनी काही वाळू माफिया विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता याचाच राग मनात धरून वाळू माफियांनी महिलांना पुढे करून सदर गुन्ह्याला शह देण्याच्या उद्देशाने तहसिलदार सचिन खाडे व त्याच्या काही सहकारी यांच्यावर ( दि १८ फेब्रूवारी ) रोजी रात्री गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल केला तसेच तहसिलदारांनी धमकी व गैरकायद्याची मंडळी जमा करून घरात प्रवेश केला असल्याची तक्रार तिन वेगवेगळ्या महिलांनी दिली होती हा सदरचा गुन्हा चुकीचा आहे याला अवाहन देण्यासाठी तहसिलदार सचिन खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विधिज्ञ सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औंरगाबाद याठिकाणी याचिका दाखल केली या प्रकरणी आज न्यायमुर्ती व्हि एम देशपांडे व न्यायमुर्ती संदिप कुमार मोरे यांच्या खंडपिठा समोर सुनावनी झाली तसेच विधिज्ञ सिद्धेश्वर ठोंबरे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून या दोन्ही खंडपिठाने सदरचे तिन गुन्हे रद्द केल्याबाबद आदेश केले आहेत .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...