उपअधीक्षकांचा तलवाडा परिसरात छापा;अठरा किलो गांजाची झाडे जप्त
गेवराई दि १८ ( वार्ताहार )
तलवाडा परिसरातील एका शेतीमध्ये गांजाची झाडे लावण्यात आली असल्याची माहिती उपअधीक्षक सोप्नील राठोड यांना मिळाली त्यांनी तात्काळ एका शेतामध्ये अचानक पणे छापा मारला तसेच या कार्यवाईत तब्बल अठरा किलो गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की ,तलवाडा त्वरीता देवी मंदिराच्या पायथ्याला एका व्यक्तीने तस्करी करण्याच्या उद्देशाने व व्यावसाय करण्याच्या हेतूने आपल्या शेतात गांजाची झाडे लावण्यात आली असल्याची माहिती गेवराईच्या उपअधीक्षक सोप्नील राठोड यांना लागली त्यांनी या प्रकरणी महसुल व पोलिस कर्मचारी सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा टाकत कार्यवाई केली या कार्यवाईत २२ गांजाची झाडे व १८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे तसेच या कार्यवाईत लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एक आरोपी ताब्यात घेतला असल्याची माहिती असुन या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सरू आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...