चार मोटार सह दोन आरोपी ताब्यात; डीबी पथकांची कार्यवाई
गेवराई दि १७ ( वार्ताहार )
तालुक्यातील गढी याठिकाणी दोन आरोपी थांबले आहेत त्यांच्याकडे चोरीच्या गाड्या असल्याची माहिती गेवराई चे डीबी पथक प्रमुख प्रफुल्ल साबळे यांना मिळाली त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या दोघांना अटक केले त्यांना विचारपुस केली असता त्यांच्याकडे चार चोरीच्या मोटार सायकल वेगवेगळ्या ठिकाणा वरून ताब्यात घेण्यात आल्या असुन तसेच पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीत यांच आरोपीनी घरफोडी केली असल्याचे तपासात उघड झाले आहे तसेच या प्रकरणात दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
या बाबद सविस्तर माहिती अशी की , कैलास बाजिराव जाधव ( वय ३० वर्ष ) राहनार संजय नगर गेवराई जिल्हा बीड चंद्रकात भ्रतरी खांडे ( ३२ वर्ष ) राहनार म्हाळस जवळा बीड असे या आरोपीची नावे आहेत तसेच यानां ( दि १६ रोजी )अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून होंडा शाईन एम एच २३ ए जे १८३८ ,पॅशन प्रो एम एच २३ एम १९७४ ,स्पेंल्डर चेसी नंबर ०४ एल १६ सी ११२९६ई ४२१५ एम ११०४२५ ,होंडाशाईन एम बी एल एचए १० एएस बीएचए ए ०३४७६ , अश्या दोन लाख रुपये किंमतीच्या गाड्या हस्तागत करण्यात आल्या आहेत तसेच याच आरोपीनी गत महिनाभरापुर्वी पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीत एक घरफोडी केली आहे या ठिकाणावरून १०, ००० हजार रपयांचे साहित्य चोरी केले असल्याची कबूली आरोपीनी तपासादरम्यान दिली आहे .तसेच या प्रकरणाशी निगडीत असनारा एक आरोपी अल्पवयीन आहे त्याला देखील लवकरच अटक कण्यात येईल.अशी माहिती गेवराई पोलिसांनी दिली आहे तसेच वरील दोन आरोपीना गेवराई न्यायालयात हजर केले असता त्यांना पिंपळनेर पोलिसांच्या स्वाधिन करण्याचे आदेशीत करण्यात आले तसेच सदरची कार्यवाई ही पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार , उप अधीक्षक सोप्नील राठोड , पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार , यांच्या मार्ग दर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सहा पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे , विठ्ठल देशमुख , कृष्णा जायभाये , अशोक सोनवणे , गणेश नागरे यांनी केली आहे .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...