पंकज कुमावत यांनी हायवा पकडल्या तर महसुलने सोडल्या

उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर वाळू माफियांवर मेहरबान 

                             गेवराई दि १३ ( वार्ताहार )

तालुक्यातील नाकझरी , राक्षसभूवनमध्ये तसेच सावरगाव याठिकाणी गेल्या महिन्यात सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी कार्यवाई करून तब्बल पाच कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता या प्रकरणी या सगळ्या गाड्या गेवराई पोलिस ठाण्यात लावण्यात आल्या यामध्ये गेवराई पोलिसांनी दंडात्मक कार्यवाई करण्यासाठी गेवराई तहसिलदार यांना पत्र पाठवले व यावर दंडात्मक कार्यवाई न करता चरीमिरी घेऊन उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी चार हायवा सोडण्याचे आदेश गेवराई पोलिसांना दिले आहेत .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई तालुक्यात वाळू माफियांनी नंगा नाच चालवला होता परंतू सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी वाळू माफियाच्या नांग्या ठेचल्या होत्या मात्र वाळू माफियावर महसुल प्रशासनच मेहरबान असल्याचं चित्र पहावयास मिळत आहे या गाड्यापैकी चार हायवा सोडण्यासाठी एका चाणक्य नायब तहसिलदारांच्या मध्यस्थिनं या गाड्या कश्या सोडायच्या या साठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होते या चार गाडी मालकांकडे सुरूवातीला कार्यवाई दरम्यान वाळू रॉयल्टीची पावती नव्हती परंतू आत्ता मध्येच आली कुठून ? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशात वाळू माफियांना क्लीनचिट दिली आहे दरम्यान या आदेशाने महसुल प्रशासन वाळू माफियांवर मेहरबान असल्याचे दिसुन येत आहे .तसेच या प्रकरणी सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सांगितले की या प्रकरणी पोलिस व महसुल कर्मचारी यांनी आपली जबाबदारी झटकली किंवा कूनाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कार्यवाई केली जाईल तसेच या वाळू माफिया विरोधात योग्य ती कायदेशीर कार्यवाई करनार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *