द केंब्रिज व्हॅली स्कूलला मिळाली सीबीएसईची मान्यता
दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळेस केंद्रीय मंडळाची मान्यता
गेवराई दि ७ ( वार्ताहार )
तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात भरारी घेतलेल्या आधार फाऊंडेशन संचलित द केंब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूलला नुकतीच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (CBSE) अधिकृत मान्यता मिळाली असून या मान्यतेने गेवराई शहरासह तालुक्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष डॉ. बी. आर. मोटे यांनी सर्व शिक्षकवृंदांचे अभिनंदन केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गेवराई तालुक्यात शिक्षण क्षेत्रात झपाट्याने वाढत असणारी शाळा द केंब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल ही तालुक्यासाठी फायद्याची ठरत आहे. शाळेत खेड्यापाड्या सह शहरातील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुणे, लातूर या ठिकाणी जावे लागत होते ही अडचण ओळखून वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक असणारे डॉ. बी. आर. मोटे यांनी ग्रामीण पातळीवर गेवराई शहरात शाळेची उभारणी केली. शाळेमध्ये उच्च शिक्षित शिक्षक, खेळ, सांस्कृतिक सह प्रत्येक गोष्टीत शाळेतील विद्यार्थी पुढे आहेत. उच्च दर्जाच्या शिक्षणासह सर्व साहित्य शाळेत उपलब्ध आहेत हे सर्व लक्षात घेता शैक्षणिक क्षेत्रातील अतिशय महत्त्वाची असलेल्या दिल्ली येथील केंद्रीय शिक्षण मंडळाच्या विभागाकडे शाळेने मान्यतेसाठी सर्व पूर्तता करत प्रस्ताव सादर केला होता.
यानंतर केंद्रीय मंडळाच्या वतीने एक समिती शाळे मध्ये दाखल झाली होती या समितीने मान्यतेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व शाळेतील शैक्षणिक वातावरण कंप्यूटर लॅब, सायन्स लॅबोरेटरी, ग्रंथालय, परीक्षा विभाग, खेळाचे सर्व मैदाने, संगीत विभाग यांची सर्व पहाणी करून शिक्षकांच्या शिकवणी पद्धतीची तपासणी केली व शैक्षणिक दर्जा पाहून दिल्ली येथील मंडळाला अहवाल सादर केला. यानंतर त्वरित दिल्ली येथून केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळाच्या वतीने द केंब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूलला अधिकृत मान्यता मिळाल्याची घोषणा करून तात्काळ 1131231 हा नोंदणी क्रमांक देण्यात आला या मान्यतेने आणखी शाळेस उभारी मिळाली असून योग्य ते शिक्षण व वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे मत शाळेच्या प्राचार्या सारिका नारायण यांनी व्यक्त केले व लवकरच या वर्षापासून कोटा पॅटर्न ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सची सुरुवात ही कोटा येथील नामांकित सुफलम एज्युकेशन पॉईंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेशी संलग्न करून चालू करण्यात येत आहे. यामुळे मुलांना औंगाबाद किंवा लातूर सारख्या ठिकाणी IIT-JEE, MHT-CET, NEET या परीक्षेच्या तयारी साठी जाण्याची गरज पडणार नाही
कोटा येथील नामांकित शिक्षक वर्ग आता गेवराई येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे अशी माहिती शाळेचे अध्यक्ष डॉ. बी. आर. मोटे यांनी दिली. या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष डॉ. बी. आर. मोटे, संचालिका डॉ. वर्षा मोटे, प्राचार्या सारिका नारायण यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान याबद्दल लाभले.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...