कार्यवाई दरम्यान पोलिस कर्मचारी यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातले
खामगाव परिसरात पोलिस अधीक्षक पथकाचा छापा; सहा ट्रॅक्टरवर कार्यवाई
गेवराई दि ४ ( वार्ताहार ) तालुक्यातील खामगाव येथील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळु उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस अधीक्षक पथकाला मिळाली होती या पथकाने ( दि ४ रोजी सायंकाळी ५) च्या सुमारास गोदावरी नदीत कारवाई करत ६ ट्रॅक्टर पकडले असुन या कारवाईत पथकातील पोलिस नाईक गणेश धनवडे यांना ट्रॅक्टरने धडक दिल्याने जखमी झाले, त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे दाखल केले व या प्रकरणी उशिरा पर्यंत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
या बाबत सविस्तर माहिती अशी की , तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळु उपसा काही केल्याने थांबत नसल्याचे चित्र दिसत असुन तालुक्यातील खामगाव येथील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळु उपसा होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पथकाला मिळाल्यावरून ( दि ४ सोमवार रोजी सायंकाळी ५ ) च्या सुमारास खामगाव येथील गोदावरी नदी पात्रात कारवाई करत तब्बल ६ ट्रॅक्टर पकडले असुन यावेळी पथकातील पोलीस नाईक गणेश धनवडे हे ट्रॅक्टरला पकडण्यासाठी गेले असता ट्रॅक्टरच्या धका लागला असता ते जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे दाखल केले होते, या प्रकरणी उशिरा पर्यंत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. ही कारवाई पोलिस अधीक्षक पथकातील पोलिस निरीक्षक गणेश धोक्रट,गणेश धनवडे,गोविंद काळे, गेवराई येथील ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडके सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...