पाडळसिंगी टोलवाल्यांची मुजोरी; बीड आगाराची बस दोन तास रोखून धरली, प्रवाशांची गैरसोय

                                 गेवराई दि. ३ (  वार्ताहर ) 

तालुक्यातील पाडळसिंगी टोल नाका व्यवस्थापनाची मुजोरीचा पून्हा एकदा प्रत्यय आला असून, बीड बसस्थानकावरून औरंगाबादला निघालेल्या बीड आगाराच्या बसला पाडळसिंगी टोल नाक्यावर तब्बल तासभर अडवून धरले. सदरील प्रकार गुरुवार ता. ३१ मार्च रोजी दुपारी चार वाजता घडला. या मुजोरीला आवरा अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्यात.

बीड आगाराची ( क्रमांक एम.एच.१४ बीटी १७६२ बीड-औरंगाबाद बस दि.३१ मार्च २०२२ रोजी दुपारी निघाली होती. सदरील बस गेवराई जवळच्या पाडळसिंगी टोल नाक्यावर आली असता,फास्ट टॅग नसल्याने ११००/- रुपये भरून टोल पास करा, अशी आडमुठी भूमिका घेतली. बस मध्ये प्रवासी होते. बसच्या महिला वाहकाने विनंती केली. ही बस परत येणार नाही. त्यामुळे, रेग्युलर टोल भरून जाऊदे, तरीही मुजोर टोल धाड प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी बसला अडवून धरले. तासभर महिला वाहक विनंती करत होत्या. परंतू , लुटारू टोल नाक्यावर बसला जावू दिले नाही.

नाविलाजाने प्रवाशाना अन्य बसमधून प्रवास करावा लागला. काहींना दोन वेळा तिकिट काढावे लागल्याने, मनस्ताप सहन करावा लागला. सरकारच्या टोल नाक्यावर सरकारी गाडीची वाट अडवून धरणाऱ्या या मुजोरांचा बंदोबस्त करावा, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. दरम्यान, एका वेळी जाण्यासाठी टोल ची रक्कम ९५ ते ६०० रु. पर्यंत करण्यात आलेली असून, टोल वाढविण्यातआला आहे. टोल वाढ करून मनमानी कारभार सुरू आहे. एवढी मुजोरी कुणाच्या आशीर्वादाने केली जात आहे. असा सवाल उपस्थित केला जात आहे. या मुजोरी मागे सरकार आणि प्रशासन आहे का, या विषयी तर्क लावले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *