झोपेतच अल्पवयीन मुलगी ठार ;विसेरा अहवालानंतर पुढील कार्यवाई
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांची माहिती
गेवराई दि २९ ( वार्ताहार )
आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रेवकी देवकीच्या गायरान परिसरातील आदीवासी( पारधी ) समाजाची वस्ती आहे त्या ठिकाणी खुन झाला अशी माहिती गेवराई पोलिसांना मिळाली तात्काळ गेवराई पोलिस घटनस्तळी दाखल झाले व मयत अल्पवयीन मुलीला उत्तरीय तपासणी साठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णलयात आनले आहे
या बाबद सविस्तर माहिती अशी की , मयुरी नवनाथ चव्हाण ( वय १४ वर्ष ) राहनार रेवकी देवकी असे या मयत अल्पवयीन मुलीचे नाव आहे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हि मुलगी बाजेवरच मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली होती तसेच याठिकाणी सकाळी वाद देखील झाला असल्याची माहिती आहे परंतू गेवराई पोलिसांनी तात्काळ घटनास्तळी धाव घेऊन परिस्थिती नियत्रंनात आनली तसेच उपअधीक्षक सोप्नील राठोड , पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार हे देखील घटना स्तळावर उपस्थित होते अचानक मरन पावल्याने या परिसरात वेगळीच चर्चा सुरू होती मात्र या मुलिचे शव उत्तरीय तपासनी साठी गेवराई च्या उपजिलहा रुग्णालयात आनले असुन विसेरा अहवाला नंतर या मुलिचा मृत्यू कसा? झाला हे स्पष्ट होईल व त्यानुसार बारकाईने तपास करून पुढील कार्यवाई करण्यात येईल असे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे यांनी सांगितले आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...