पंदरा लाखांचा मुद्देमाल जप्त ;डीबी पथकांची कामगिरी
गेवराई दि २५ ( वार्ताहार )
गेवराई शहरात दोन युवकांंकडे तब्बल १८ चोरीच्या मोटार सायकल मिळून आल्या आहेत सदरच्या या सगळ्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असुन दोन आरोपी यांना ताब्यात घेतले आहे तसेच या कार्यवाईत एकूण १५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे सदरची कार्यवाई ही गेवराई पोलिस ठाण्याच्या डीबी पथकांने केली आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , मोबीन शेख राहनार गेवराई व मोहंमद शफी मोहंमद अंन्सारी राहनार भिंवडी मुंबई अश्या दोन आरोपीना गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्याकडे चौकशी केली असता वेगवेगळ्या कंपनीच्या १८ मोटार सायकल मिळून आल्या आहेत काल रात्री एका आरोपीला गेवराई पोलिसांनी भिंवडी येथून ताब्यात घेतले आहे तर दुसऱ्याला गेवराईतून अटक केली आहे यांची चौकशी केल्यानंतर सदरच्या मोटारसायकल चोरीच्या असल्याची बाब निदर्शनास आली आहे या कार्यवाईत एकूण १५ लाख ७५ हजार मुद्देमाल मिळून आला आहे व जप्त करण्यात आला आहे तसेच वरिल दोघांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे . सदरची कार्यवाई ही अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार , उपविभागीय पोलिस अधिकारी सोप्नील राठोड , पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार , यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सहा पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे , विठ्ठल देशमुख , कृष्णा जायभाये ,दत्ता चव्हाण , एकनाथ कावळे , यांनी केली आहे
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...