शिवसेना पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी आणि शिवसैनिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उद्या गेवराईत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, धाराशिवचे खा ओमराजे निंबाळकर हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जि प चे माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजीत पंडित यांनी केले आहे.
राज्यातल्या प्रत्येक निवडणुकीला ताकदीने सामोरे जाऊन, शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने शिवसेना खा ओमराजे निंबाळकर हे उद्या दिनांक 23 मार्च रोजी गेवराईत येत आहे. शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना, युवासेना, किसान सेना, महिला आघाडी यांच्या वतीने शहरातील बेदरे लॉन्स, कोल्हेर रोड येथे सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात खासदार ओमराजे निंबाळकर हे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी मेळाव्यास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी राज्यमंत्री तथा शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख बदामराव पंडित, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव आदींसह शिवसेना पदाधिकार्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिवसंपर्क अभियानांतर्गत आयोजित केलेल्या या मेळाव्यास गेवराई तालुक्यातील सर्व आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन व सर्व सदस्य यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक तथा माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडीत यांनी केले आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...