विमला विद्या मंदिर मधे विद्यार्थ्यांना कोविड १९ चा पहिला डोस
गेवराई दि २१ ( वार्ताहार )
विमला विद्या मंदिर जायकवाडी वसाहत गेवराई या शाळेत ६ वी व ७ वी वर्गातील विद्यार्थ्यांना कोविड १९ चा पहिला डोस देण्यात आला. यावेळी शाळेच्या वतीने सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना विशेषतः १२ ते १४ वर्षे च्या दरम्यान वय असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शालेय विद्यार्थी सुरक्षित झाले पाहिजेत यासाठी विमला विद्या मंदिर जायकवाडी वसाहत गेवराई या शाळेत सोमवार दि. २१ रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला. यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक वंदना हिरे यांनी उपस्थित डॉ. सोनाली मिसाळ ,सुजाता निसर्गन, निलेश आघाव, गोरख राठोड, पत्रकार सखाराम शिंदे, माने मामा आदींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन चौकटे यांनी तर आभार राहुल आतकरे यांनी व्यक्त केले. या पहिल्या लसीसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक वंदना हिरे, वैशाली पाटील , ज्योती सुर्डीकर, मनोज जोशी , राहुल आतकरे , स्वाती तुरूकमारे,गजानन चौकटे , मधुकर हतागळे आदींनी सहकार्य केले.