पराभवाने खचून न जाता लोकहितासाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार – विजयसिंह पंडित
मौजे जदीद जवळा व वारोळा येथे १ कोटी ४७ लक्ष रुपये किंमतीच्या नळपाणी पुरवठा योजनेचा भव्य शुभारंभ
गेवराई दि २० ( वार्ताहार )
राज्यात परिवर्तन झाले मात्र गेवराई विधानसभा मतदारसंघात परिवर्तन झाले नाही, तरी पण आपण खचलो नाही. मतदानरुपी आशीर्वाद देणाऱ्या या मतदारसंघातील लोकहितासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. राज्यातील सत्ता आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अजून भरपुर विकासकामे करायची आहेत. येणाऱ्या काळात असेच मतदानरुपी आशीर्वाद देऊन आपल्या भागाचा जि.प. आणि पं.स. सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजयी करुन पाठवा असे भावनिक आवाहन माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. जलजिवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत मौजे जदीद जवळा आणि वारोळा येथे १ कोटी ४७ लक्ष रुपये किंमतीच्या नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
जलजिवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत गेवराई विधानसभा मतदार संघातील मौजे जदीद जवळा येथे ७९ लाख २५ हजार २२६ रुपये आणि वारोळा येथे ६८ लाख २१ हजार ८०७ रुपये किंमतीच्या नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ रविवार दि.२० मार्च रोजी माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जदिद जवळा येथे जि.प.सदस्य शरद चव्हाण, सरपंच कृष्णा बोचरे तर वारोळा येथे सभापती भागवत खुळे, सुनिल तौर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांला यापरिसराने खूप कांही भरभरून दिले. लोकांनी शिवछत्र परिवारावर विश्वास टाकला. मतदानरुपी आशीर्वाद दिला. मात्र लोकप्रतिनिधी नसलो तरी राज्यात आपले सरकार आहे, जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आहे. या सत्तेच्या माध्यमातून आपल्या लोकांसाठी काहीना काही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषदेचा सभापती असताना मागच्या काळात जदिद जवळा, जायकोचीवाडी या भागात पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केला. शिवछत्र परिवाराकडे सत्ता नसली तरी गेवराई विधानसभा मतदार संघासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापुर्वी आपण ज्या पद्धतीने पाठीशी उभा राहिलात त्याच पद्धतीने यापुढील काळातही या भागातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होईल यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत असे आवाहन करुन सार्वजनिक कामाबरोबरच वैयक्तिक कामांचीही पूर्तता केली जाईल. या भागात उसाचे क्षेत्र जास्त आहे. नोंदी झाल्या नसल्या तरी पुढील हंगामात कारखान्यांची क्षमता अजून वाढवली जाईल आणि या भागातील सर्व ऊस कारखाना उचलेल अशी ग्वाही देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्याचे काम जयभवानी कारखाना करत आहे असेही ते म्हणाले.
वारोळा येथे बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, या परिसराने आपल्याला झुकते माप दिले ते कधीही विसरता येणार नाही. पराभव झाला तरी लोकांमध्ये जाऊन लोकांची सेवा केली पाहिजे हे आदरणीय दादांचे संस्कार आहेत, त्यामुळे लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालो. विविध योजनांच्या माध्यमातून जे जे करता येईल ते ते केले. राज्यात आणि जिल्ह्यात आपली सत्ता आहे त्या माध्यमातून या परिसरासाठी जे काही चांगले करता येईल ते येणाऱ्या काळात केले जाईल. आतापर्यंत २० कोटीपेक्षा जास्त रूपये किंमतीच्या पाणीपुरवठा योजना पहिल्या टप्प्यात मंजूर करून आणल्या आहेत आणि या पुढील काळातही पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी पाणी पुरवठा योजनांसाठी निधी खेचून आणला जाईल. जलजिवन मिशन पाणी पुरवठा ही फार महत्त्वाची योजना आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. ही पाणी पुरवठा योजना आपल्या गावात आणली आहे. तीचे काम चांगल्या पद्धतीने करून घेण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण या योजनेचे काम चांगले होण्यासाठी प्रयत्न करावेत असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी जदिद जवळा येथे गुलाब मोरे, शेख सलिम, करण येवले, प्रल्हाद कबले, आबासाहेब चव्हाण, नवनाथ चव्हाण, बळीराम चव्हाण, पापालाल राठोड, साहेबराव गाडेकर, भगवान बोचरे, विजय बोचरे, राजू जगताप, विश्वाभंर बोचरे, चंदर राठोड, बंडु काळे, राजैश चव्हाण, दत्ता आळणे तर वारोळा येथे गोपाळ तौर, प्रमोद गरड, राजेंद्र तौर, राजेंंद्र डावकर, आसमान तौर,मनोहर राठोड, प्रल्हाद तौर,लक्ष्मण तौर, राजाभाऊ तुपारे, रामेश्वर कसपटे,विक्रम गायकवाड, बंडू खाटीक मारे, संभाजी तौर, आण्णासाहेब तौर, महेश बादाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विजयसिंह पंडित यांचे दणदणीत स्वागत करुन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.