वाळू माफियांची मुजोरी,पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न,तिघांवर गुन्हा दाखल
गेवराई दि १७ ( वार्ताहार )
बीड जिल्ह्यामधील वाळू माफियांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच ते वाळूमाफिया हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याच्या यापूर्वीसुद्धा अनेक घटना घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा वाळू माफिया आणि थेट पोलीस हवालदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन वाळू माफियां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबद सविस्तर माहिती अशी की , काल ( दि १६ रोजी ) सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने गोदापात्रात कार्यवाई दरम्यान ही घटना घडली आहे गेवराई तालुक्यातील खामगाव आणि सावरगाव परिसरातील गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर छापा टाकताना. सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने या परिसरामध्ये पाच वाहनांसह १९ ब्रास वाळू असा एकूण तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे सकाळी सात वाजता ही कारवाई करण्यात आली.
गेवराई तालुक्यातील खामगाव परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात साठवून ठेवलेली वाळू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आणि त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गोदावरी नदीच्या पात्रात एका ट्रॅक्टरमध्ये ते अगदी वाळू भरली जात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यावेळी या पोलीस पथकातील खबरदार बालाजी दराडे आणि राजू वंजारे यांनी ट्रॅक्टरकडे धाव घेतली. मात्र त्याचवेळी ट्रॅक्टर चालकानं ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न करत तिथून पळ काढला. यावेळी प्रसंगावधान साधून हे दोन्ही पोलीस बाजूला झाले. मात्र इथं वाळू भरणाऱ्या दोघांनी हातामध्ये वाळू भरण्याचं खोरं या दोन पोलिसांकडे फिरवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पोबारा केला.
दरम्यान, पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा ट्रॅक्टर चालक अनिल उर्फ अण्णा साळुंके, त्यानंतर सचिन उर्फ बँजो अंकल साळुंखे आणि आसमान उर्फ पप्पू या तिघांवर गेवराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे हे तिन्ही आरोपी जालना जिल्ह्यातील आहेत.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...