गेवराई दि १३ ( वार्ताहार ) गेवराई शहरात सध्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये एका स्टॉलवर पोलिस उपअधीक्षक पथकांने छापा मारला असुन सदरच्या छाप्यात बंदूकीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई शहरात सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात शेतात जनावरे मारण्यासाठी बंदुकीचा स्टॉल लावण्यात आला होता मात्र तिन हजार रुपयांपासुन ते साठ हजार रुपयापर्यंत बंदूक खरेदी करा कृषी प्रदर्शनातील एका स्टॉलवर अचानक सहा वाजण्याच्या सुमारास पोलिस उपअधीक्षक सोप्नील राठोड यांच्या पथकाने सदरच्या स्टॉलवर छापा मारला व, संपुर्ण बंदूकीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे तसेच या बंदूकीमुळे जिवाचा धोका निर्माण होऊ शकतो यामुळे सदरच्या स्टॉलवर कार्यवाई करण्यात आली असल्याचे समजते व लाखों रुपयाचा बंदूकीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन या प्रकरणी तपास करून पुढील योग्य ती कार्यवाई केली जाईल अशी माहिती डीबी पथक प्रमुख प्रफूल्ल साबळे यांनी दिली आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...