April 19, 2025

शहाजानपुर चकला प्रकरणात शिवसेनेच्या दोन आमदारांचा ताराकिंत प्रश्न

दोषी अधिकारी यांच्यावर कार्यवाईचे संकेत

                    गेवराई दि ८ ( वार्ताहार )

गेवराई तालुक्यतील शहाजानपुर चकला या ठिकाणी गोदापात्रात असनाऱ्या वाळूच्या खड्ड्यात बूडुन चार बालकांचा मृत्यू झाला होता या प्रकणात अद्याप दोषी अधिकारी यांच्यावर कार्यवाई करण्यात आलेली नाही परंतू शिवसेनेच्या दोन विधान परिषद आमदारांनी या प्रकरणात ताराकिंत प्रश्न उपस्थित केल्यानं बीडचं महसुल प्रशासन खडबडून जागे झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे या प्रश्नांवर महसुलमंत्री कोणत्या अधिकारी यांच्यावर कार्यवाई करतात हे लवकरच स्पष्ट होईल .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , बीड आणि गेवराईच्या सिमेवर असनारे गांव शहाजानपुर चकला आहे ७ फेब्रूवारी रोजी पाच वाजण्याच्या सुमारास चार शाळकरी बालकांचा वाळूच्या खड्ड्यात बूडुन मृत्यू झाला होता रात्री उशीरापर्यंत बीड आणि गेवराईचे महसुल व पोलिस प्रशासन यावर एकमेकांकडे बोट दाखवत होते हद्दीवरून हे सगळे चालले होते परंतू या प्रकरणात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी ज्या प्रकारे लक्ष घातले होते तशी अपेक्षीत कार्यवाई या प्रकरणी झालेली नाही तसेच या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली होती परंतू या समितेने अहवाल सादर करूनही कित्येक दिवस लोटले तरी दोषी अधिकारी यांच्यावर कार्यवाई झालेली नाही परंतू या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शिवसेनेचे विधान परिषद आमदार सुनिल शिंदे व आमदार विलास पोतनिस यांनी याबाबद ताराकिंत प्रश्न उपस्थीत केला आहे तसेच या प्रकरणी एका तक्राराने पोलिसांत तक्रार नोंदविली आहे चार वाळू माफिया विरोधात गुन्हा देखील दाखल आहे अद्याप तिन लोकांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतलेली नाही या ताराकिंत प्रश्नांमध्ये नदीपात्रात अनाधीकृत वाळू उपसा करनाऱ्या वाळू माफियांवर काय ? कार्यवाई केली तसेच दोषी अधिकारी यांच्याविरुद्ध कोणती कार्यवाई केली आहे तसेच अधिकारी यांच्यावर कार्यवाई केली नसेल तर यांची कारणे काय? आहेत यांंचा खूलासा मागवण्यात आला आहे . हा प्रश्न उपस्थीत झाल्यानं बीड व गेवराई महसुल विभागात खळबळ उडाली असुन लवकरच या प्रकरणी दोषी अधिकारी यांच्यावर कार्यवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *