यशवंत विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारोप

             बीड दि ६ ( वार्ताहार ) 
शहरातील यशवंत विद्यालय या शाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च एप्रिल २०२२ साठी शुभेच्छा देण्यात आल्या. याकरिता शाळेमध्ये शुभेच्छा समारोह आयोजित केला गेला होता.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव गोविंद्रावजी वाघ होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सत्येंद्र पाटील आणि बीड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री जे. एम. पैठणे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश वाघ, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मधुकर धुमाळ उपस्थित होते.प्रमुख पाहुणे प्रा. सत्येंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शालेय जीवनात शिस्तीचे महत्व विषद करीत जीवनात जिद्द आणि चिकाटी या गुणांना अनन्यसाधारण महत्व असून प्रत्येकांनी आपले ध्येय मोठे ठेवले पाहिजे असे सांगून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

     तसेच मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष जे. एम. पैठने यांनी विद्यार्थी कसा असावा असे विविध उदाहरण देऊन भविष्यात कशा प्रकारचे शिक्षण त्यातील संधी याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच कोणतेही कार्य करताना ते सर्वोत्कृष्ट होईल या दृष्टीने केले पाहिजे असे सांगून शाळा विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांनी सराव परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव केला आणि सर्व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास इयत्ता आठवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश वाघ यांनी तर सूत्रसंचालन गीते एस‌.जी यांनी केले.याप्रसंगी विद्यार्थी रोहित तांदळे, राहुल चव्हाण, गंगाधर राऊत , सांची खेमाडे यांनी आपले विचार व्यक्त केले. आभार प्रदर्शन शिक्षक मुळे ए‌.टी. यांनी केले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *