गेवराईच्या कलाविष्कार प्रतिष्ठानचा ८ मार्च रोजी बीड येथे होणार “नारीशक्ती” पुरस्काराने सन्मान
गेवराई दि ५ ( वार्ताहार )
सकारात्मक विचारांनी सहकुटुंब, सहपरिवार एकत्र येऊन गेवराई तालुक्यातील सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हिरिरीने काम करत, महिलांना संधी देणाऱ्या कलाविष्कार प्रतिष्ठानचा जागतिक महिला दिनी बीड येथे गौरव नारी शक्तीचा या कार्यक्रमात “नारीशक्ती” पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
५० टक्के महिला सदस्य असलेल्या गेवराईच्या कलाविष्कार प्रतिष्ठानकडून, कार्यवाहक दिनकर शिंदे आणि सचिव सौ आशाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ७ वर्षापासून कला, क्रीडा, साहित्य, पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करण्यात येत आहे. विशेषतः विविध क्षेत्रात समाज हितासाठी काम करणाऱ्या मान्यवरांना कलाविष्कार प्रतिष्ठानकडून दरवर्षी गेवराई भूषण पुरस्कारासह गेवराई रत्न पुरस्काराने गौरव करून प्रोत्साहन दिल्या जात आहे. त्यामुळे गेवराई तालुक्याचा सांस्कृतिक वारसा जपणारा परिवार म्हणून “कलाविष्कार” कडे पाहिले जाते. याच कार्याची दखल घेऊन दिनांक ८ मार्च या जागतिक महिला दिनी, बीड येथे प्रतिष्ठानच्या सचिव सौ आशाताई शिंदे यांच्यासह सदस्य सौ ज्योतीताई झेंडेकर, सौ स्वातीताई कोठेकर, सौ रोहिणीताई आडाळे, सौ रेणुकाताई मिटकर, सौ कविताताई लाड, सौ माधुरीताई चौकटे, सौ प्रियंकाताई पुणेकर, सौ गीताताई तिवारी, सौ अवांतिकाताई माने, सौ सीताताई महासाहेब, सौ योगीताताई गंगणे यांचा “नारीशक्ती” पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
बीड येथील बंसल क्लासेस (कोटा) आणि सौ के एस के महाविद्यालय यांच्यावतीने अ भा मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षा, प्राचार्य डॉ दीपाताई क्षीरसागर आणि बंसल क्लासेसच्या संचालिका डॉ सारिकाताई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली, दि ८ मार्च २०२२ या जागतिक महिला दिनी “गौरव नारी शक्तीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात गौरवशाली काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिला आणि महिलांना सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा “नारीशक्ती” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यात कलाविष्कार प्रतिष्ठानचा “नारीशक्ती” पुरस्काराने गौरव होणार आहे.सदर कार्यक्रम दि ८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता, सौ. के एस के महाविद्यालय सभागृह, बीड येथे होणार असल्याची माहिती आयोजक डॉ दिपाताई क्षीरसागर व डॉ सारिकाताई क्षीरसागर यांनी दिली आहे.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...