शिवशारदा मल्टीस्टेटचे कार्य उल्लेखनीय-विक्रांत पाटील
शिवशारदा मल्टिस्टेटला सदिच्छा भेट
बीड दि.४ ( वार्ताहार )
शिवशारदा मल्टीस्टेटने अल्पावधीतच जनसामान्यांमध्ये विश्वास निर्माण केला असून येणारा काळ त्यांच्यासाठी उज्वल आहे असे गौरवोद्गार कर्मवीर बाबुराव (आण्णा) पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विक्रांत पाटील उर्फ बाळराजे यांनी केले. बीड येथील शिवशारदा मल्टीस्टेटला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
मोहोळ जिल्हा सोलापूर येथील कर्मवीर बाबुराव (आण्णा) पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विक्रांत पाटील यांनी बीड येथील शिवशारदा मल्टीस्टेट आणि भवानी अर्बन बँकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी भवानी अर्बन बँकेचे संस्थापक तथा माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित आणि युवानेते रणविर पंडित यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवाजीराव कदम, प्रकाशराव डावकर, मल्टिस्टेटचे सरव्यवस्थापक अजिंक्य पाटील उपस्थित होते.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...