April 19, 2025

गेवराईचे तहसिलदार रजेवर श्रीराम भेंडे यांच्याकडे गेवराईचा पदभार

             गेवराई दि १ ( वार्ताहार )

गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे हे वैद्यकीय रजेवर गेले असल्यामुळे आता गेवराई तहसिलदार पदाचा अतिरीक्त पदभार शिरूरचे  कासारचे तहसिलदार श्रीराम  भेंडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांच्यावर काही दिवसांपुर्वी तिन वेगवेगळे गुन्हे गेवराई पोलिसांत दाखल करण्यात आले होते याप्रकरणी गेवराई महसुल मधिल एका चाणक्य नायब तहसिलदार यांने या प्रकरणी वाळू माफिया यांना छुपी मदत केली असल्याची माहिती आहे गेवराई महसुलच्या अंतर्गत गटबाजिने तहसिलदार सचिन खाडे यांचा बळी घेतला अशी चर्चा आहे गेवराई तालुक्यातील अवैध वाळू तस्करी याला लगाम लावण्यासाठी महसुल प्रशासन असर्थ ठरले आहे त्यातच तहसिलदार सचिन खाडे हे वैद्यकीय रजेवर गेल्यानं आता गेवराईच्या तहसिलदार पदाचा पदभार आपल्याकडेच येणार असल्याचा भास एका नायब तहसिलदार याला होता मात्र  जिल्हाधिकारी यांनी गेवराई तहसिलदार पदाचा अतिरिक्त पदभार शिरूर कासारचे तहसिलदार श्रीराम भेंडे यांच्याकडे सोपण्यात येत असल्याबाबदचे आद्यादेश काढले आहेत .म्हणून आता त्यांचा भर्मनिरास झाला आहे वाळू उपसा रोखण्यात तहसिलदार श्रीराम भेंडे काय उपाययोजना करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *