गेवराई दि २६ ( वार्ताहार ) शहरातील संजय नगर भागात रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते शेषेराव सोनेराव तौर यांच अपघाती निधन झाल्याची घटना ( २५ वार शुक्रवार रोजी ) घडली मृत्युसमई ते ४५ वर्षाचे होते .संजय नगर भागातील मित्राच्या खाजगी कार्यक्रमाला जात असतांना येरमळा जवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला यामध्ये त्यांच्या सोबत असनाऱ्या तिन जण किरकोळ जखमी झाले आहेत परंतू शेषेराव तौर यांना उस्मानाबादच्या जिल्हा रूग्णलयात दाखल केल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले गेवराई शहरात त्यांचा चांगला मित्रपरिवार होता त्यांच्या अश्या अकाली जाण्यानं सर्वांना धक्का बसला आहे संजय नगर मध्ये सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असायचे त्यांच्या पश्चात आई , बहिन , पत्नी , मुले असा परिवार असुन चिंतेश्वर स्मशान भूमित त्याच्या पार्थीवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी भागातील अनेक नागरिक उपस्थित होते तसेच त्यांच्या अश्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.