राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याची कार्यकारणी जाहिर
अध्यक्षपदी महेश मोटे तर कार्याध्यक्षपदी विठ्ठल पवार यांची निवड
गेवराईत कलावंत साकारणार अनोख्या पध्दतीने शिवप्रतिमा
गेवराई, दि.१४ ( वार्ताहार )
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. सोहळ्याच्या पूर्व तयारीसाठी आयोजित बैठकीमध्ये सर्वानुमते कार्यकारीणीची निवड करण्यात आली. महेश मोटे यांची अध्यक्ष तर विठ्ठल पवार यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे रेखाचित्र अनोख्या पध्दतीने साकारून शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले जात असून कलाकारांकडून साकारण्यात येणार्या शिवप्रतिमेचे आकर्षण शिवप्रेमींना असणार आहे.
विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून मागील अनेक वर्षांपासून नेत्रदिपक आणि शिस्तबध्द शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते. मध्यधुंद तरुणांचा धांगडधिंगा, वर्गणीच्या नावाखाली होणारी लुट यांसारख्या अनिष्ट रुढी परंपरा बंद करून विजयसिंह पंडित यांनी शिवजन्मोत्सवाची ओळख राज्यभर निर्माण केली आहे. यावर्षी भव्य मैदानावर शिवप्रतिमेचे रेखाचित्र तयार करून विश्वविक्रम करण्याचा मानस शिवजन्मोत्सव सोहळा समितीने केला आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या पूर्व तयारीसाठी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये कार्यकारीणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी महेश मोटे, कार्याध्यक्ष माजी नगरसेवक विठ्ठल पवार, सह कार्याध्यक्ष सरवर पठाण, उपाध्यक्ष सोमनाथ गिरगे, प्रथमेश वाव्हळ, किशोर वादे, शेख बाबुभाई (जेके), सचिव गजानन पिसाळ, सहसचिव वैभव दाभाडे, कोषाध्यक्ष अकाश सुतार, सह कोषाध्यक्ष शेख जुनेद यांची निवड करण्यात आली तर कार्यकारणीचे मार्गदर्शक सदस्य म्हणून विजयकुमार वाव्हळ, महंमद गौस, दिपक आतकरे, किशोर कांडेकर, आनंद सुतार, राधेशाम येवले, दादासाहेब घोडके, जालिंदर पिसाळ, दत्ता दाभाडे, विलास निकम, उत्तमराव सोलाने, अक्षय पवार, जयसिंग माने, शेख रहिम, गोरखनाथ शिंदे, संदिप मडके, दत्ता पिसाळ, भाऊसाहेब माखले यांची निवड करण्यात आली. यावेळी नुतन पदाधिकार्यांचा विजसिंह पंडित यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शेख मन्सुर, शाम रुकर, सदा वादे, युवराज जाधव, वचिष्ठ शिंदे, गुफरान इनामदार, वसीम फारोकी, विष्णूपंत घोंगडे, धम्मपाल भोले, जिजा पंडित, शेख बाबुभाई, बाळासाहेब दाभाडे, राहुल मोटे, शेख राजू, कृष्णकांत पाटील, आनंद दाभाडे, सय्यद अल्ताफ, युनूस फंटर, दिनेश घोडके, अमन सुतार, संतोष आंधळे, रजनी सुतार, रवि दाभाडे, आकाश होनमाने, कृष्णा गळगुंडे, संग्राम पंडित, गौतम कांडेकर, कांता नवपुते, अर्जुन सुतार, रणविर शिंदे, उमेश संत आदींसह गेवराई शहरातील शिवप्रेमी नागरीकांची उपस्थिती होती.