बांधिलकी जोपासली;डॉक्टर भावले यांनी वाचवले दोन जीवांचे प्राण..!
गेवराई दि. 6 ( वार्ताहर )
गळ्याला फास बसून गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलेल्या दोन जीवाच्या एका गरीब विवाहित महिलेला डॉक्टर सुरज भावले यांनी अथक परिश्रम करून वाचविले असून, त्यांनी दाखविलेल्या बांधिलकीचे कौतुक केले जात आहे. एका पैशाचीही अपेक्षा न करता त्यांनी अत्यवस्थ महिलेवर उपचार केले. नव जीवन रुग्णालयाचे संचालक डॉ. भावले यांच्या रूपाने सय्यद कुटुंबाला देवच भेटल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरातील यशराज नगर येथील रहिवासी श्रीमती सय्यद (वय 28) यांच्या गळ्याला फास बसून सदरील महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 31 जानेवारी 2022 रोजी दु. 12 वाजता घडली होती. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. घराच्या गच्चीवर कामात व्यस्त असताना त्यांच्या गळ्याला दोरीचा फास बसल्याने, तिला गंभीर अवस्थेत सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून, तिला बीडला हलविण्यात आले होते. गरीब कुटूंबातील या तरुणीला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बीड येथील संजीवनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. डॉक्टर भावले यांनीसलग चार दिवस गंभीर अवस्थेतल्या श्रीमती सय्यद यांच्यावर यशस्वी उपचार करून त्यांचा जीव वाचवला. विशेष बाब म्हणजे, सदरील महिला तीन महिन्याची गरोदर असून, नवजीवन रुग्णालयाचे संचालक डॉ. सुरज भावले यांच्या टीमने दोन जीवांना जीवदान दिले आहे. शिवसेना मदत कक्ष ता. उपाध्यक्ष उज्वल सुतार यांच्यासह सम्राट सुतार, मिथून सुतार यांनी श्रीमती सय्यद यांना उपचार मिळवून देण्यासाठी मदत केली असून, त्यांचे कौतुक होत आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...