वाळूच्या केनिमुळे एकाचा बळी ;राक्षसभूवन येथील घटना

दोषीवर कडक कार्यवाई करणार तहसिलदार खाडे यांची माहिती 

                      गेवराई दि ४ ( वार्ताहार )

अनाधिकृत वाळू उपसा बंद होण्याचे नाव घेत नसुन याच ज्या केनिच्या साह्याने वाळू उपसा केला जातो त्या केनिवर काम करणा-या एका तरूण मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर ठिकाणावरूण या तरुणाचा मृत्यूदेह उमापुरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात टाकून आरोपीनी पलायन केले असल्याची माहिती आहे सदरची घटना ही दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

    या बाबद सविस्तर माहिती अशी की , राजेंद्र विक्रम शिंदे ( वय ३१ वर्ष ) राहनार खेर्डा तालुका पैठण जिल्हा औंरगाबाद असे या मयत तरूणाचे नाव असुन हा तरूण वाळू उपसा करण्याच्या केनिचा मजुर असल्याची माहिती आहे या केनिवर वाळू उपसा करतांना त्यांचे वायरहूक तुटून त्यांच्या डोक्यावर गंभीर ईजा झाली त्यानंतर तो गोदापात्राच्या खड्यात पडला आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे तसेच मयत झाल्यानंतर त्या तरूणाचा मृत्यूदेह उमापुरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून आरोपीनी पलायन केले असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणने आहे घटनेची माहिती मिळताच तहसिलदार सचिन खाडे , चकलांबा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांनी घटनास्तळावर धाव घेतली आहे . तसेच या प्रकरणी दोशीवर कायदेशीर कार्यवाई करण्यात येईल . असे तहसिलदार सचिन खाडे यांनी सांगितले आहे .

प्रकरण दडपण्यासाठी वाळू तस्करांची फिल्डिंग ..!

राक्षसभूवनच्या एका वाळू तस्करांच्या वाळुच्या केनिवर सदर मजूर काम करायचा याचां मृत्यू झाला हे प्रकरण दडपण्याची वाळू माफियांनी तगडी फिल्डिंग लावली आहे उमापुरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर मोठी वाळू तस्करांची गर्दी जमा झाली होती .दरम्यान या प्ररकरणी कोणावर कार्यवाई केली जाते व कोणला वाचवले जाते हे लवरकच स्पष्ट होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *