लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त ; पुष्पासह सहकारी ताब्यात
गेवराई दि २ ( वार्ताहार ) तालुक्यातील राजपिंप्री येथिल एका जणाच्या शेतात चंदन तस्करी करून त्यांचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्यानुसार त्यांनी सदरील ठिकाणावर छापा टाकला या कार्यवाईत एक पुष्पासह पाच जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई तालुक्यातील राजपिंप्री येथे शेतातील चंदनाचे झाडे तोडून त्यांचा चोरट्या मार्गाने वाहतूक करुन लाखों रुपये कमावनारा पुष्पा अखेर जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ह्या ठिकाणी छापा टाकण्यात आला होता राजपिंप्री येथिल शेतात हा सगळा मुद्देमाल साठवण्यात येत होता आणि त्यानंतर त्यांची स्कॉर्पियो गाडीतून तस्करी केली जात होती यामुळे ही गाडीही जप्त केली आहे अंदाजे पन्नास किलो चंदन नावाचे लाकडे जप्त करण्यात आले असुन या प्रकरणी एक पुष्पा सह त्यांचे पाच साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे सदरची कार्यवाई पोलिस अधिक्षक आर राजा स्वामी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक जोंधळे, पोहे ठोंबरे खेडकर , पोना दुबाले , बागवान , पवार , शिंदे , यांनी केली आहे
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...