दोन कोटीसाठी उद्योजकांचे अपहरण ; गाडी बंद पडल्याने अनर्थ टळला

                  गेवराई दि २७ ( वार्ताहार )
तालुक्यातील मादळमोही येथील प्रसिद्ध उद्योजक याच्या गाडीला पाठिमागून जोराची घडक दिली यानंतर त्यांना स्कॉर्पिओ गाडीत नेत चार ते पाच जणांनी अपहरण केले व त्यांना दोन कोटीची खंडणी मागण्यात आली असल्याची घटना काल बूधवार रोजी घडली .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , कैलास शिंगाटे ( वय ४० वर्ष ) राहनार मादळमोही असे या उद्योजकांचे नाव असुन मादळमोही परिसरात त्यांच्या गाडीला पाठिमागून जोरांची धडक देऊन गंभीर जखमी करून त्यांच्या तोंडात बोळा टाकून वडगोद्रीच्या कॅनॉलजवळ गाडी बंद पडली त्यानंतर त्यांचे हातपाय बांधून गाडी सोबत पाटात गाडी फेकण्यात आली परिसरात गर्दी जमा झाल्यानंतर खंडणीखोर प्रसार झाले असल्याची माहिती आहे घटनास्तळावर गोंदी पोलिस तात्काळ दाखल झाले व त्यांनी गाडीत मिळालेल्या कागदपत्रा अधारे कैलास शिंगाटे यांच्या नातेवाईकांना सपर्क केला परंतू यात उद्योजक पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालंबाल बचावले आहेत चार ते जणांनी त्यांचे अपहरण केले होते आणि दोन कोटी दे नाहीतर तूला मारून टाकू असे खंडणीखोर हिंदी भाषेत बोलत असल्याची माहिती उद्योजक कैलास शिंगाटे यांनी दिली आहे त्यांच्या तक्रारीवरूण गोंदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदरचा गुन्हा तपासासांठी चकलांबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती गोंदी पोलिसांनी दिली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *