विद्यार्थ्यांनो आपला जाज्वल्य ईतिहास वाचा – रणविर अमरसिंह पंडित

जयभवानी विद्यालय व महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गेवराई दि.२६ (प्रतिनिधी) आपला ईतिहास जाज्वल्य आहे. विद्यार्थ्यांनो ईतिहास वाचा तो समजून घ्या त्यावरच आपले भविष्य घडत असते असे प्रतिपादन युवानेते रणवीर अमरसिंह पंडित यांनी केले. जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कला व विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवाजीनगर, गढी येथील जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तथा कला व विज्ञान महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी युवानेते रणवीर अमरसिंह पंडित, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीराम आरगडे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग आर्सुळ, माजी सरपंच राणोजी गोंजारे, चेअरमन रामेश्वर गरड, प्राचार्य वसंतराव राठोड, प्राचार्य डॉ सदाशिव सरकटे, उपप्राचार्य सानप आर.एस., पर्यवेक्षक गायकवाड के.एन.आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी रणवीर पंडित यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर ध्वजारोहन करण्यात आले. पर्यवेक्षक के.एन. गायकवाड यांनी याप्रसंगी संविधान उद्देश पत्रिकेचे सामुदायिक वाचन केले. यावेळी विद्यालयाच्या संगीत विभागाने स्वागत गित आणि देशभक्तीपर गिते सादर केली. विद्यालयातील संगित शिक्षक राजेंंद्र काळे याच्या संस्काराचे मोती या संगित उपक्रमाबद्दल तर विद्यार्थी निसर्ग काळे यांने पोवाडा गायन केल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रणविर पंडित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य वसंत राठोड यांनि केले .सुत्रसंचलन रणजित बडे, क्रिडाशिक्षक राजेंद्र कव्हळे, देविदास गिरी यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ सर्वश्री वैजिनाथ कुलकर्णी, धर्मराज कदम, पाराजी मोरे, किसनराव शिंदे, किसन यमगर, दत्ता येवले, सुरेश पवार, प्रविण पवार, राजेंद्र हिंगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.बंडू शेवाळे, विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा.शिवाजी पवळ यांच्यासह ईयत्ता दहावी आणि बारावीचे कांही विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *