गेवराई दि २५ ( वार्ताहार ) तालुक्यातील अनेक गांवातील राष्ट्रीय कुटूंब अर्थसाह्य मिळावे म्हणून या योजनेत दारिद्र रेषेखालील नागरिकांनी तहसिलदार यांच्याकडे अर्ज सादर केले होते परंतू पात्र लाभार्थी असुन त्याचां निधी वाटप करण्याऐवजी तो परत पाठवला आहे अश्या बेजाबदार गेवराईच्या तहसलदार सचिन खाडे यांच्यावर कार्यवाई करावी अश्या मागणीचे निवेदन वंचित आघाडी ने जिल्हाधिकारी यांना दिले आहे .
गेवराईचे तत्कालिन तहसिलदार धोंडिबा गायवाड यांच्या कार्यकाळात २०८ राष्ट्रीय कुटूंब अर्थसाहाय्य योजनेतील वरिल लाभार्थी पात्र ठरले होते यांचा निधीही जिल्हाधिकारी यांनी पाठवला होता याच प्रकरणात मंजूर झालेला निधी विद्यमान तहसिलदार सचिन खाडे यांनी परत पाठवला आहे तसेच या २०८ पात्र लाभार्थी यांच्यावर अन्याय केला आहे व आपल्या कर्तव्यात कुसूर केल्या प्रकरणी दफ्तर दिरंगाई कायद्याखाली त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाई करावी नसता लोकशाही मार्गाने अंदोलन छेडण्यात येईल. अश्या मागणीचे निवेदन वंचितचे तालुका अध्यक्ष पप्पू गायवाड , किशोर भोले , ज्ञानेश्वर हवाले यांनी दिले आहे
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...