April 19, 2025

भडंगवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

                 गेवराई दि.19 ( वार्ताहार ) 

गेवराई तालुक्यातील मौजे भडंगवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळवले असुनमाजी आमदार अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांचे विश्वासू सहकारी ज्ञानेश्वर माऊली नवले यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.

मौजे भडंगवाडी ग्रामपंचायतच्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत वार्ड क्रं २ मधून सौ कुशीवार्ता वामन निकम तर वार्ड क्रं ३ मधून श्रीमती रुक्मिणीबाई विठ्ठल माखले यांचा विजय झाला आहे. गेवराई तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीचे सदस्य ज्ञानेश्वर माऊली नवले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने हे यश मिळवले असून विजयी उमेदवारांचे माजी आमदार अमरसिंह पंडित व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्विजयसिंह पंडित यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान पोटनिवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल विजयी उमेदवार तसेच गेवराई तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीचे सदस्य ज्ञानेश्वर माऊली नवले व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *