महिला सरपंचास मारहान करत गोळ्या घालण्याची धमकी; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

 

                 गेवराई  दि 16 ( वार्ताहार ) 

गावातील सप्ताहच्या अनुशंगाने कोविड 19 चे नियम व मार्गदर्शन यासंदर्भात बोलावण्यात आलेल्या बैठकीत एकाने महिला सरपंचाच्या दिशेने चप्पल भिरकावत थेट त्यांच्या डोक्याला बंदुक लावल्याचा प्रकार बोरगाव चकला (ता. शिरूर का.) येथे काल घडला. यावेळी सरपंचांच्या पुतण्यालाही काचेची बॉटल फेकुन मारल्याने तो गंभीररित्या जखमी झाला असुन याप्रकरणी महिला सरपंचाच्या फिर्यादीवरून सहा जणांविरूद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

या बाबद सविस्तर माहिती अशी की ,शिरूर कासार तालुक्यातील बोरगाव चकला येथे काल सकाळी गावातील सप्ताह संदर्भात कोविड 19 चे नियम व मार्गदर्शन करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी दादासाहेब राख यांनी ‘आम्ही सप्ताह करणार आहोत, तुम्हाला काय गरज आहे, तुम्ही कोण आहात ?’ असे म्हणुन महिला सरपंच छबुबाई ज्ञानोबा राख (वय 67 वर्ष ) यांना शिवीगाळ करून त्यांच्या तोंडाच्या दिशेने चप्पल भिरकावली. एवढेच नव्हे तर जिवे मारून टाकीन अशी धमकीही दिली .

कोविडच्या बैठकीतच महिला सरपंचावर बंदुक रोखले. छबुबाई राख यांच्या फिर्यादीवरून दादासाहेब शहादेव राख, शहादेव भानुदास राख, नागेश रामराव राख, रामराव एकनाथ राख, ज्ञानेश्वर किसन राख, उद्भव रघुनाथ खेडकर (सर्व रा. बोरगाव चकला) ता. शिरूर यांच्याविरूद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात कलम 143,  144, 147 , 148 ,  149 , 307,324, 323, 504, 506, भा.द.वि.3/ 25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्याला बंदुक लावली. त्याचवेळी सरपंच छबुबाई यांचो पुतण्या प्रविण राख हा वाद सोडवण्यासाठी पुढे आला असता दादासाहेब राख यांनी हातातील काचेची बॉटल पुतण्या प्रविणला फेकुन मारली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याचवेळी अन्य चार ते पाच जणांनी हातात काठ्या, कुन्हाडी घेवून सरपंचासह इतरांना लाथा-बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. तुम्ही गावाच्या बाहेर आलात तर एखाद्या दिवशी गोळ्याच घालतो अशा धमक्या दिल्या अशी तक्रार त्यांनी चकलांबा  पोलिसांत दाखल केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास चकलांबा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *