कलाविष्कार प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 18 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता, पुरस्कार विजेत्यांचा गौरव सोहळा व कोरोनाबाबत जनजागृती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाहक, पत्रकार दिनकर शिंदे यांनी दिली आहे.शहरातील चिंतेश्वर मंदिर येथील सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील आदर्शवत काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यासोबतच कोरोना बाबत जनजागृती करून, आरोग्य विभागाला सेवाभावी वृत्तीने सहकार्य करण्यासाठी कलाविष्कार प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती मल्टीस्टेटच्या सौजन्याने, सदस्यांसाठी कोरोनाबाबत जनजागृती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास चिंतेश्वर संस्थांचे महंत दिलीप बाबा घोगे, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, सौ गिरीकाभाभी पंडित, तहसीलदार सचिन खाडे, छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी, सौ आरतीताई भंडारी, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप राठोड, पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, न प मुख्याधिकारी उमेश ढाकणे, उपशिक्षणाधिकारी प्रवीण कळम पाटील, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कलाविष्कार प्रतिष्ठानच्या पदाधिकारयांच्या दिनांक 14 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत, सदर गौरव सोहळा आणि कोरोना जनजागृति मार्गदर्शन शिबिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून संपन्न होणार असल्याचे सांगून, येणाऱ्या काळात कोरोना विषयी जनजागृतीसाठी कलाविष्कार प्रतिष्ठान भरीव काम करणार असल्याचेही प्रतिष्ठानचे कार्यवाहक, पत्रकार दिनकर शिंदे यांनी सांगितले आहे. यावेळी बैठकीस प्रतिष्ठानचे सदस्य नारायण झेंडेकर, एकनाथ लाड, शिवप्रसाद अडाळे, सचिन पुणेकर, संतोष कोठेकर, राम महासाहेब, गणेश मिटकर, गणेश माने, गजानन चौकटे, चंपकलाल तिवारी, आशा शिंदे, ज्योती झेंडेकर, रोहिणी आडाळे, प्रियंका पुणेकर, स्वाती कोठेकर, सीता महासाहेब, रेणुका मिटकर, अवंतिका माने, माधुरी चौकटे, गीता तिवारी आदी सदस्य उपस्थित होते.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...