गेवराई तालुक्यात राष्ट्रवादीत जोमात भाजप-सेना कोमात

कोळगाव व बोरीपिंपळगावचे आणि बागपिंपळगाव येथील भाजप सेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

गेवराई दि.१२ ( वार्ताहार ) गेवराई विधानसभा मतदारसंघातील भाजप-सेना नेतृत्वाला कंठाळून आनेक कार्यकर्त्यांची सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार ईनकमिंग सुरु झाली असून कोळगाव येथील भाजपाचे कट्टर समर्थक
आसाराम बारहत्ते, माजी सरपंच किशोर शेळके तर बोरीपिंपळगाव येथील भाजप सेनेचे कार्यकर्ते मधुकर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड तसेच
बागपिंपळगाव येथील भाजपाचे ग्रा.पं. सदस्य भारत देवकते, जयमल्हार ग्रूपचे अध्यक्ष ऋषिकेश महानोर, यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

कोळगाव येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आसाराम बारहत्ते, माजी सरपंच किशोर शेळके, भिमराव नेमाने, लक्षीमन नेमाने, रामदास येडे, बबन येडे, बबन तळेकर, धनंजय बारहत्ते, रमेश बारहत्ते, शिवमूर्ती बारहत्ते, पप्पू खुटाळे, शिवनारायण खुटाळे, संतोष खुटाळे, संताराम जोगदंड, राजेंद्र जोगदंड, दत्ता तळेकर, तात्या तळेकर, जयदत्त सोनसाळे, जालिंदर जोगदंड, सुरेश पांगरे, शिवाजी पांगरे, श्रीमंत पांगरे, योगेश नेमाने, दशरथ नेमाने, अंगद नेमाने, बळीराम बारहत्ते, महादेव नेमाने, लक्षीमन जोगदंड, छगन बारहत्ते, बिभीषण कांबळे, दिगंबर बहिर, तात्यासाहेब बारहत्ते, अशोक जाधव, दिपक नेमाने, परमेश्वर बारहत्ते, श्रीराम बारहत्ते, इंद्रजित जोगदंड, वसंत जोगदंड, भिमा शिंदे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा ला सोडचिट्ठी देत माजी आमदार अमरसिंह पंडित आणि जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले..यावेळी संदीपान दातखीळ, विकास सानप, सुरेश लोंढे, राजेंद्र कदम, किशोर पारीख, बिभीषण करांडे, रमेश करांडे, आबासाहेब करांडे, विष्णू जगदाळे, सुरेश जाधव, उद्धव करांडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बोरी पिंपळगाव येथील भाजप-सेनेचे सक्रिय कार्यकर्ते मधुकर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, राजेंद्र गायकवाड, तुकाराम गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीमध्ये कृष्णाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, माजी सभापती कुमारराव ढाकणे, राष्ट्रवादी युवक विधानसभा क्षेत्राअध्यक्ष गजानन काळे गणेश वडघने, भारत पवार, नितीन पवार, सतिष आहेर, भास्कर वडघने आदी उपस्थित होते

बागपिंपळगाव येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते ग्रा.पं. सदस्य भारत देवकते, जयमल्हार ग्रूपचे अध्यक्ष ऋषिकेश महानोर, यांच्यासह भारत कोकरे, संतोष जनक, दत्ता महानोर, अमोल जानकर, राहूल देवकते, एकनाथ सूळ, वैभव साबणे, गोकुळ मुगुटराव, दीपक देवकते, शंकर चितळकर, प्रकाश कोकरे, आबासाहेब ठोंबरे, रामेश्वर देवकते, दत्ता शेंडगे, सोनू महानोर, बिभीषण जामकर, लक्ष्मण लोखंडे, अभिमन्यू हरनोळ, पप्पू शेंडगे, सचिन चितळकर, राहुल शेंडगे, नवनाथ कोकरे, दत्ता सूळ, हनुमान होगले, शुभम शेंडगे, सचिन माटे, महेश खंडागळे, सुनील मुगुटराव,बाळू कोकरे, विलास खंदारे, विलास मुगुटराव,राहुल जामकर,अमोल शेंडगे, शुभम कोकरे, सचिन महारनोर, सोमनाथ महारनोर,एकनाथ महारनोर, नारायण मुगुटराव, प्रभाकर मुगुटराव, प्रभू हळनोर,अतुल सगळे, अंगद सगळे, अक्षय हळनोर, स्वप्नील कादे,लक्ष्मण लोखंडे, अमोल जामकर, मयूर शेंडगे, संभाजी चोरमोले, दीपक चोरमोले, भागवत पिंगळे, राम पिंगळे, शंकर शेंडगे, आकाश कांबळे, आबा शेंडगे, अमीन शेख, हर्षद सगळे, अंगद शेंडगे, दादासाहेब शेंडगे, युवराज शेंडगे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा ला सोडचिट्ठी देत माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीमध्ये बाग पिंपळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले.

यावेळी जि. प. सदस्य फुलचंद बोरकर, राष्ट्रवादी युवकचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गजानन काळे, जनार्धन चितळकर, कालिदास चोरमोले, मधुकर मुगुटराव, कैलास मुगुटराव, सरपंच यासिन भाई, युवराज नागरे, सतीश गाडे, राजेंद्र टकले यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *