शेतीचे उत्पादन कमी खर्च ज्यादा, कर्जबाजारी पनाला कंटाळुन तरुण शेतक-यांची आत्महत्या
गेवराई दि 11 ( वार्ताहार )
गेवराई तालुक्यात अतिवृष्टीत केळी आणि खरिप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने करण्यात आलेला खर्च पदरात पडला नाही. शिवाय दोन वर्षांपासून कोरोना साथीने विम्याचे काम मंदावल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या तरुण शेतकरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील रामपुरी येथे घडली आहे .
अशोक बाजीराव पवार( वय 39वर्ष ) रा रामपुरी असे नाव त्या मयत तरुणाचे आहे. पाच एकर जमीनीत दहा -बारा जणांच्या कुटुंबाचा प्रंपच चालणे कठीण होत असल्याने शेती करुन पाच वर्षांपासून विमा कंपनीच्या एजंट यांच्या अधिपत्याखाली काम करत असतानाच अशोक पवार विमा एजंट झाले.यामुळे कुटुंबीयाला आर्थिक अडचणीस हातभार मिळु लागला. पुढे भाऊ विभक्त झाला आई वडील पत्नी आणि तीन मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आली. शिवाय दोन वर्षांपासून कोरोना साथीने विम्याचे काम मंदावले परिणामी भाव वाटणीने आलेल्या अडीच एकर जमीनीपैकी एक एकर केळी लागवड करुन उर्वरित दीड एकरात खरिप पिक घेतले.परंतु अतिवृष्टीने केळी बाग उध्वस्त झाली खरिप हंगामातील कापूस, सोयाबीन खरडून गेली. केळी बागेस व खरिप पिकास केलेला खर्च पदरात पडला नाही.विम्याचा व्यवसायाला कोविड मुळे लगाम बसला आर्थिक चणचण निर्माण होऊ लागली आता मुलांचे शिक्षण कसे होणार याची चिंता अशोक पवार यांना गेल्या एक महिन्यापासून सतावत होती.त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहीती कुटुंबीयानी दिली आहे
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...