शासकीय कामात अडथळा ; दोघांविरोधात गुन्हा

                    गेवराई दि 9 ( वार्ताहार )
शहरातील नगर परिषद हद्दीत  असलेल्या गाळा बंद करत असतांना तो कसा बंद करता व सिल लावत असतांना सिल तोडून पुन्हा दुकान उघडल्याने गेवराई नगर परिषद च्या कर्मचारी यांनी दोघांजणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

या बाबद अधीक माहिती अशी की , काही दिवसांपुर्वी या गाळ्यात मोठा वाद झाला होता एकामेकांवर परस्पर विरोधी गुन्हे देखील दाखल आहेत वादग्रस्त मिळकत सिल करण्याचे निर्देष उपविभागीय अधीकारी स्वप्निल राठोड यांनी गेवराई नगर परिषदेला दिले होते . याच प्रकरणी गेवराई नगर परिषदेचे कर्मचारी भागवत येवले यांनी घटनास्तळावरील गाळा सील करत असतांना त्यांच्या सोबत हुज्जत घालून सदरची कार्यवाई रोखण्याचा प्रयत्न करूण सिलबंद दूकान उघडल्या प्रकरणी आरोपी कल्याण विठ्ठल जाधव व कृष्णा विठ्ठल जाधव यांच्या विरोधांत गून्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस उप निरीक्षक बोडके हे करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *